'तुम्ही माझी चेष्टा करत..', डान्स स्टेपवर प्रश्न विचारताच अजय देवगणचं गंभीरपणे उत्तर VIDEO
Ajay Devgn on dance step on Son of Sardaar 2 Pehla Tu Duja Tu Song : अभिनेता अजय देवगण याचं Son of Sardaar 2 एका गाण्यावरुन ट्रोलिंग सुरु आहे. यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Ajay Devgn on dance step on Son of Sardaar 2 Pehla Tu Duja Tu Song : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्याच्या ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमातील मृणाल ठाकूरसोबतच्या ‘पहला तू, दूजा तू’ या गाण्यातील ‘फिंगर डान्स स्टेप’वर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अजय देवगनच्या बोटांनी केलेल्या डान्स स्टेपवर सोशल मीडियावर जोरदार मीम्स व्हायरल झाले. या स्टेपवर नेटिझन्सनी भरभरून विनोद केले. अखेर अजय देवगनने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मीम्सचा खेळकरपणाने स्वीकार करत त्याने कबूल केलं की हे स्टेप करणे त्याच्यासाठी खूप कठीण होतं, आणि लोकांनी किमान त्याच्या प्रयत्नाचं कौतुक तरी करावं.
View this post on Instagram
‘सन ऑफ सरदार २’च्या ट्रेलर लाँचवेळी अजय देवगन म्हणाला, “तुम्ही लोक माझी चेष्टा करता, पण माझ्यासाठी हे स्टेप करणं खूप अवघड होतं. तरीही मी केलं, त्याबद्दल तरी आभार माना.”
‘पहला तू, दूजा तू’ स्टेपवर मीम्सबाबत अजय देवगन म्हणाला, “माझ्या मते हे सगळे मीम्स खूप मजेदार आहेत – आणि खरंतर हाच हेतू होता. जेव्हा लोकांना काहीतरी विनोदी वाटतं आणि आवडतं, तेव्हाच ते व्हायरल होतं. त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झालाय.”
मिस मालिनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये काजोल अजय देवगनचा व्हायरल स्टेप पाहून खळखळून हसताना दिसते. ती खेळकरपणाने म्हणते, “माझ्या मते अजय देवगन हा आपल्या फिल्म इंडस्ट्रीतला एक उत्कृष्ट डान्सर आहे. कारण तो सध्या बोटांनीही डान्स करू शकतो. आधी असं होतं की एखादा अभिनेता चालत यायचा आणि त्याच्या पावलांनुसार संगीत तयार व्हायचं. आता फक्त बोटांनी डान्स करतोय – एक, दोन, तीन, चार! माझ्या मते तो इंडस्ट्रीतील सगळ्यात हुशार डान्सर्सपैकी एक आहे.”
‘सन ऑफ सरदार 2’ चे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केलं असून, अजय देवगन, रवी किशन, संजय मिश्रा, मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरद सक्सेना, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव हे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत.
हा चित्रपट जिओ स्टुडिओज आणि देवगन फिल्म्स प्रस्तुत करत आहेत. देवगन फिल्म्स आणि SOS 2 लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित, या चित्रपटाचे निर्माते अजय देवगन आणि ज्योती देशपांडे आहेत. एन. आर. पचिसिया आणि प्रवीण टळरेजा सहनिर्माते आहेत, तर कुमार मंगत पाठक हे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 25 जुलै 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
गावाकडची लाडकी आर्ची आता शहरात जाऊन बदलली, रिंकू राजगुरुच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस


















