Aishwarya-Abhishek Bachchan : लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ऐश्वर्या-अभिषेकने शेअर केला खास ‘थ्रोबॅक’ फोटो!
Aishwarya-Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत. या 15 वर्षांच्या सोबतीत त्यांनी मिळून आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे.
Aishwarya-Abhishek Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूड विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडीपैकी आहेत. नुकताच त्यांनी आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस साजरा केला. याच खास दिवसाचं निमित्त साधत आता ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी एक खास थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय नेहमीच एकमेकांना खंबीर पाठींबा देताना दिसले आहेत. या 15 वर्षांच्या सोबतीत त्यांनी मिळून आयुष्यातील अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आजही ही जोडी मनोरंजन विश्वातल्या आदर्श जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
पाहा पोस्ट :
ऐश्वर्या आणि अभिषेकचा लग्न सोहळा अतिशय भव्य होता. या बिग फॅट लग्नातील एका खास क्षणाचा हा फोटो आहे. या फोटोत केवळ दोघांचे हात दिसत आहेत. अभिषेक ऐश्वर्याच्या हातात अंगठी घालताना दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते देखील भूतकाळात रमले. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होती. या भव्य लग्नसोहळ्यात अवघं बॉलिवूड विश्व अवतरलं होतं.
अभिषेकच्या ‘दसवी’ची चर्चा!
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा ‘दसवीं’ (Dasvi) हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून, ज्या लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे ते सोशल मीडियावर आपल्या भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच या चित्रपटात अभिषेक बच्चनचा दमदार अभिनय पाहायला मिळणार असल्याचा अंदाज लोक बांधू लागले होते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. आता चित्रपट पाहिल्यानंतर अभिषेक बच्चन लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे, हे लोकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होतेय. यासोबतच यामी गौतमनेही आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
संबंधित बातम्या