Entertainment News: 2 तास 50 मिनटांची क्राईम-थ्रिलर फिल्म, काळजाचा ठोका चुकवणारे कित्येक सीन्स, IMDb किती रेटिंग?
Entertainment News: एका असा सायकॉलॉजिकल थ्रिलर सिनेमा जो तुम्ही नक्की पाहायला हवा...

Entertainment News: कधीकधी तुम्ही एखादा सिनेमा (Crime Thriller Film) पाहिल्यानंतर कित्येक दिवस तुमच्या मनात त्याबाबत विचार घोगावत राहतात. त्यातल्या काही गोष्टींचा तुम्हाला आभास होत राहतो. कधीकधी तर वाटतं की, त्या सिनेमाप्रमाणेच कुणीतरी तुमचा पाठवाग करतोय. अंधारात काहीतरी लपून बसलंय आणि ते तुम्हाला पाहतंय, असंही सारखं वाटत राहतं. असंच काहीसं होतंय सुपरहिट तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर 'रत्सासन'नं (Ratsasan) अनेक प्रेक्षकांसोबत तेच केलंय. आता या सिनेमाचा तेलुगू रिमेक 'राक्षसुदु' (Telugu Remake Of Rakshasudu) पुन्हा एकदा लोकांना तिच भिती घालतोय, पण याची पद्धत थोडीशी वेगळी आहे.
सिनेमाची कथा काय? (What Is Story Of The Movie?)
'राक्षसुदु'ची कथा काहीशी वेगळी असून ती सर्वसामान्य माणसांभोवती फिरते. अरुण नावाचा मुलगा चित्रपट दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न उरी बाळगून फिरत असतो. तो क्राईम थ्रिलर सिनेमाचा अभ्यास करतो आणि लिहितो. पण त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर, तो त्याचे स्वप्न सोडून देतो आणि पोलिसांत सामील होतो. त्याच्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये, त्याला एका भयानक सिरीयल किलरचा सामना करावा लागतो. हा दुष्ट माणूस निष्पाप शाळकरी मुलींना लक्ष्य करतो आणि नेहमीच पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होतो.
आता अरुण त्याच्या जुन्या छंदाला त्याच्या व्यवसायात बदलण्याचा निर्णय घेतो. सिनेमे पाहून त्यातील सीरियल किलर्सच्या विचारांना समजून घेतो. तो खुन्याच्या मनात खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक पावलावर सस्पेन्स निर्माण होतो. प्रत्येक दृश्यात असं वाटतं की, तो आता पकडला जाणार, पण नाही... चित्रपटाच्या शेवटच्या 30 मिनिटांत, तुम्ही अस्वस्थ झाल्याशिवाय राहू शकत नाही, एवढा सस्पेन्स पाहायला मिळतो.
कलाकारांचा धमाकेदार अभिनय
साई श्रीनिवास अरुणची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे. त्याच्या डोळ्यांतून भीती, राग आणि धैर्य बाहेर येतं. अनुपमा परमेश्वरननं त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे आणि भावनिक दृश्यांमध्ये ती अपवादात्मक आहे. उर्वरित सहाय्यक कलाकारांनी देखील एक दमदार अभिनय केला आहे, विशेषतः खलनायकाचा. जेव्हा त्याचा चेहरा उघड होतो, तेव्हा तो खरोखरच काळजात धडकी भरवतो. हा चित्रपट फक्त 2 तास 2 मिनिटांचा आहे, पण प्रत्येक मिनिटाला एक नवं वळण घेतो. IMDb वर त्याचं रेटिंग 7.9 आहे आणि खरोखरंच तो सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलरपैकी एक आहे.
दरम्यान, हा सिनेमा आता ZEE5 वर उपलब्ध आहे. जर तुम्ही सायकॉलॉजिकल थ्रिलरचे चाहते असाल तर हा चित्रपट नक्की पाहा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
No Other Choice Movie Review: नो अदर चॉइस (2025) : बेरोजगारांच्या जगण्याचा आटापिटा
























