एक्स्प्लोर

Exclusive : महाराष्ट्रात सशर्त चित्रिकरण सुरु होणार; चित्रिकरण सुरु करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातली चर्चा फलद्रुप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने ही झूम मिटिंग घडवून आणली होती. एबीपी माझाने हा विषय सर्वप्रथम लावून धरला. त्यानंतर  चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांनी या विषयाला गती दिली. राज यांनी गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांशी झूमद्वारे संपर्क साधून आपली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात संवाद झाल्याची माहीती दिली.

मुंबई : गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेल्या मनोरंजनसृष्टीच्या चित्रिकरणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मनोरंजनसृष्टीतल्या मान्यवरांशी झूमवरून चर्चा करून चित्रिकरण राज्यात सुरु करण्याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असं आश्वासन दिलं होतं. त्याला 12 तास उलटण्यापूर्वीच राज यांनी उद्धव यांच्याशी याबद्दल संवाद साधला. मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार, मुख्यमंत्री राज्यात चित्रिकरण सुरु करण्यासाठी अनुकूल असून त्यासाठी निर्माते, वाहिन्या यांना काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेने ही झूम मिटिंग घडवून आणली होती. एबीपी माझाने हा विषय सर्वप्रथम लावून धरला. त्यानंतर  चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि शालिनी ठाकरे यांनी या विषयाला गती दिली. राज यांनी गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांशी झूमद्वारे संपर्क साधून आपली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात संवाद झाल्याची माहीती दिली. या बैठकीस उपस्थित असलेल्या एका मान्यवराने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहीती दिली. त्यानुसार, मनोरंजन क्षेत्रातील वाहिन्या, प्रोड्युसर्स यांनी बायोबबल तयार करून चित्रिकरण करण्याचा प्रस्ताव सरकारला द्यायचा आहे. या प्रस्तावात चित्रिकरण कुठे करणार, किती दिवस करणार, त्यातल्या युनिटमध्ये कोण कोण असणार, त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी असेल आदी गोष्टी नमूद करायच्या आहेत. काटेकोर नियम पाळून बायोबबलमध्ये चित्रिकरण कसं करणार हे या प्रस्तावात असायला हवं. तसा प्रस्ताव आला तर आपण याबद्दल विचार करू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. विशेष बाब अशी की असा फुलप्रुफ प्रस्ताव जर निर्मात्यांना राज ठाकरे यांच्याकडेही देता येणार आहे. तो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्या मंजूरीसाठी पाठपुरावा करता येईल असंही मत या झूम बैठकीत व्यक्त केलं गेलं.


Exclusive : महाराष्ट्रात सशर्त चित्रिकरण सुरु होणार; चित्रिकरण सुरु करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातली चर्चा फलद्रुप

राज आणि उद्धव यांच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा मुद्दा चर्चिला गेला तो चित्रिकरणासाठी उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या ठिकाणांचा. हे चित्रिकरण महाराष्ट्रात सुरु होत असलं तरी राज्यात सर्वत्र याची परवानगी सध्या देता येणार नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या भागात सध्या चित्रिकरणाला परवानगी देता येणार आहे.  गुरूवारी झालेल्या झूम बैठकीला महेश कोठारे, महेश मांजरेकर, नितीन वैद्य, अंकुश चौधरी, सचिन पिळगांवकर, विजू माने, केदार शिंदे, प्रवीण तरडे, अजित भुरे, निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

राज्यात चित्रिकरण सुरु व्हायला हवं, याविषयी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार : राज ठाकरे 

महत्त्वाच्या बातम्या

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget