एक्स्प्लोर

राज्यात चित्रिकरण सुरु व्हायला हवं, याविषयी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार : राज ठाकरे 

परराज्यापेक्षा महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक आहेत. हे लक्षात घेता, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

मुंबई : ब्रेक द चेन अंतर्गत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागला. चित्रिकरण थांबलं. गेल्या वेळी पडला तसा खंड पडू नये म्हणून अनेक निर्मात्यांनी परराज्यात आसरा घेतला. आता जवळपास महिन्याभरापासून तिकडे त्यांचं चित्रिकरण सुरू आहे. परराज्यापेक्षा महाराष्ट्रात चित्रिकरणासाठी लागणाऱ्या सुविधा अधिक आहेत. हे लक्षात घेता, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागात चित्रिकरण करायला काहीच हरकत नाही असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. मनसे चित्रपट सेनेने आयोजित केलेल्या झूम बैठकीत राज यांनी उपस्थितांचे सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि ही बैठक संपता संपता आपलं हे मत मांडलं. 

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या पुढाकाराने मनोरंजनक्षेत्रातल्या मान्यवरांची झूम बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मराठी चित्रपट, मालिका, नाटक या क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या 50 पेक्षा जास्त मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला. ही बैठक दीड तास चालली. या बैटकीत अनेक मुद्दे मांडले गेले. यात प्रामुख्याने आले ते चित्रिकरण सुरू करण्याचा मुद्दा. बायोबबल प्रणालीनुसार परराज्यात जर काम होतं तर महाराष्ट्रातही होऊ शकेल असं मत यावेळी मांडण्यात आलं. शिवाय, लोककलावंतांंना आर्थिक पॅकेज मिळावं, थिएटर्स मालकांची झालेली अवस्था, वाद्यवृंदाचे कलाकार, रंगमंच कामगार यांना अनुदान मिळावं, सध्या तयार असलेल्या चित्रपटांबद्दल काय करता येईल असे अनेक मुद्दे यावेळी मांडले गेले. 

राज ठाकरे यांनी शांतपणे सगळ्यांचे मुद्दे ऐकले आणि ते टिपूनही घेतले. यातल्या अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे बोलले. काही मुद्दे आपण स्वत: मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असं आश्वासन त्यांनी दिलंच, शिवाय पुढच्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल असा विश्वासही दर्शवला. गरज पडली, तर आपण मुख्यमंत्र्यांसोबतही झूम बैठक करू असं यावेळी त्यांनी सांगितलं. या बैठकीला महेश मांजरेकर, केदार शिंदे, अंकुश चौधरी, लोकेश गुप्ते, सतीश राजवाडे, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, अमित फाळके, कौशल इनामदार, समित कक्कड, आदित्य सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Lock Upp: 52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget