एक्स्प्लोर

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?

Snake In Shahrukh Khan House: वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार, घटनास्थळी पोहोचल्यानंतर बंगल्याच्या आवारात एका शिडीखाली 8 फुट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला.

Snake Rescue In Shahrukh Khan Mannat Bungalow: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानचं (Shahrukh Khan) मुंबईतील (Mumbai News) वांद्रे (Bandra) इथे असलेलं घर नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. शाहरुख खान (Actor Shahrukh Khan) राहत असलेलं 'मन्नत' (Mannat) हे आलिशान घर पाहण्यासाठी देशभरातून कित्येक चाहते त्याच्या घराबाहेर गर्दी करतात. शाहरुख खानच्या याच 'मन्नत' बंगल्यात (Mannat Bungalow) सध्या खळबळ माजली आहे. शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दोन सापांचा वावर (Snake In Shahrukh Khan Mannat) असल्याचं निदर्शनास आलं आहे. 8 फूट लांबीच्या धामण सापाचं (Rat Snake) इथून रेस्क्यूसुद्धा करण्यात आलंय. 
  
मुंबईतील (Mumbai News) वांद्रे पश्चिम इथला अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्यावर दोन साप आढळल्याची माहिती मिळाल्यानं एकच खळबळ उडाली. 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारास 8 वाजता सर्पमित्र विक्की दुबे यांना मन्नत बंगल्याच्या परिसरात दोन साप एकमेकांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याचा फोन आला. त्यानंतर त्यांनी वन विभागाच्या राऊंड ऑफिसर दीपक दादा गायकवाड आणि मुंबई रेंज कार्यालयाच्या ठाणे कंट्रोलला माहिती दिली.

वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार, घटनास्थळी पोहोचल्यानंतर बंगल्याच्या आवारात एका शिडीखाली 8 फुट लांबीचा धामण जातीचा बिनविषारी साप आढळून आला. सर्पमित्र विक्की दुबे यांनी कोणतीही इजा न होऊ देता, सुरक्षितपणे सापाचं रेस्क्यू केलं.

दरम्यान, दुसरा साप मात्र परिसरात लोकांची वर्दळ सुरू झाल्यानं तिथून पळून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो आढळून आला नाही. 

धामण साप बिनविषारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर 'मन्नत'च्या सुरक्षा रक्षकांसह घरातील व्यक्तींनी सुटकेचा नि:श्वास सोडला. रेस्क्यू केलेल्या सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलाय. 

जगभरात प्रसिद्ध आहे, शाहरुख खानचं निवास्थान असलेलं 'मन्नत' (Shahrukh Khan Mannat Bungalow)

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचं आलिशान घर मुंबईतील वांद्रे येथील Bandstand परिसरात, समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे. 'Mannat Land's End' या नावानं ओळखलं जाणारं हे घर मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी घरांपैकी एक आहे. वाढदिवस किंवा ईदसारख्या खास प्रसंगी शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी होते. इतर दिवशीही 'मन्नत'ची झलक पाहण्यासाठी आणि घराबाहेर लावण्यात आलेल्या नेमप्लेटसोबत फोटो काढण्यासाठी इथे चाहते तुफान गर्दी करतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली

About the author अजय माने

अजय माने
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Actress Hayden Panettiere Passes Away: वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
वाढदिवसाच्या पाच दिवसांआधीच अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप; प्रसिद्ध टेलिव्हिजन शोच्या स्टार अभिनेत्रीचं 36व्या वर्षी निधन
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Embed widget