Pushpa 2 Allu Arjun: पुष्षा 2 नंतर 'या' फिल्ममध्ये झळकणार अल्लू अर्जुन; बदलणार लूक अन् स्टाईलही होणार चेंज
Pushpa 2 Allu Arjun: पुष्पा 2 नं जगभरात खळबळ माजवल्यानंतर अल्लू अर्जुन आता त्याच्या पुढच्या प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे. त्याचा पुढचा प्रोजेक्ट काय आहे, माहीत आहे का?
Pushpa 2 Allu Arjun: पुष्पा (Pushpa 2 The Rule) फेम अल्लू अर्जुनची (Allu Arjun) हवा काही कमी होण्याचं नाव घेत नाही. 2020 पासून, अल्लू अर्जुननं आपला सर्व वेळ सुकुमारच्या पुष्पा: द राइज (2021) आणि पुष्पा 2: द रुल (2024) साठी दिला. इतर प्रोजेक्ट्सना हो म्हणुनही अल्लू अर्जुननं पुष्पा पूर्ण होण्याची वाट पाहिली. यामागील कारण म्हणजे, जोपर्यंत पुष्पाची शुटिंग पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो त्याचा लूक बदलू शकणार नव्हता. आता अल्लू अर्जुनचा पुष्पा रिलीज तर झालाच आहे, पण पुष्पानं संपूर्ण देशभरात दबदबा निर्माण केला आहे. पण, आता अल्लू अर्जुन त्याचे पुढचे प्रोजेक्ट्स सुरू करणार आहे.
अल्लू अर्जुनच्या पुढच्या चित्रपटावर नागा वामसी काय म्हणाले?
M9 शी बोलताना, निर्माते नागा वामसी यांनी अलीकडेच अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टबाबत खुलासा केला. दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवाससोबतच्या त्याच्या चौथा चित्रपटाविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 2025 च्या उन्हाळ्यात आगामी चित्रपटाचं शुटिंग सुरू करण्यापूर्वी अल्लू अर्जुन त्याची भाषा आणि देहबोलीवर काम करणार आहे.
अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाच्या नावाबाबत विचारल्यावर वामसी म्हणाले की, "आम्ही स्क्रिप्टिंग जवळपास पूर्ण केलं आहे. बनी (अर्जुन) मोकळा झाल्यावर त्याची तयारी करण्यासाठी तो त्रिविक्रमला भेटेल. यासाठी त्याला त्याची देहबोली आणि तेलुगू भाषेवर काम करावं लागेल. त्यावर बरंच काम करावं लागेल आणि आम्हाला वाटते की पुढील उन्हाळ्यात चित्रपट पूर्ण होण्यास खूप वेळ लागेल आणि यासाठी आम्हाला एक खास सेट बनवावा लागेल.”
View this post on Instagram
चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही पण अर्जुन आणि त्रिविक्रम यांचा हा चौथा एकत्र चित्रपट आहे. याआधी जुली (2012), एस/ओ सत्यमूर्ती (2015) आणि आला वैकुंठपुररामुलू (2020) आलं. चित्रपटाची घोषणा जुलै 2023 मध्ये करण्यात आली होती आणि गीता आर्ट्स, हरिका आणि हसीन क्रिएशन्स द्वारे निर्मीत केली जाणार आहे. चित्रपटाच्या घोषणा व्हिडीओच्या मजकुरात 'यावेळी काहीतरी मोठे', असं वचन प्रेक्षकांना दिलं आहे. त्यांचे दोन्ही चित्रपट यापूर्वीही हिट झाले आहेत, त्यामुळे या प्रकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत.