एक्स्प्लोर

Marathi Movie : मराठी आणि कन्नडा सिनेमाची एकत्र बांधणी, 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'मध्ये शिवनी सुर्वेची महत्त्वाची भूमिका

Marathi Movie : 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेत्री शिवानी सुर्वे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

Marathi Movie :  काही महिन्यांपूर्वी 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' (Operation London Cafe ) या मराठी सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. या सिनेमाचा लूक पाहून मराठी प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता की हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार? विशेष म्हणजे, मराठी आणि कन्नडा सिनेमाचं कोलॅबोरेशन म्हणजे 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' हा सिनेमा. या सिनेमात शिवानी सुर्वेसह (Shivani Surve) अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

हा सिनेमा कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये पॅन इंडिया रिलीज होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमातील स्टार आणि मराठी कलाकार यांची फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही प्रेक्षकांसाठी मनोरंजक अशी ट्रीट असणार आहे. 

सिनेमाचा टीझर प्रदर्शित

दिपक पांडुरंग राणे, विजय कुमार शेट्टी हवाराल, आणि रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात दाखवलेल्या सीन्सनी, कलाकारांच्या अभिनयाच्या झलकने, थरारक ऍक्शन सिक्वेन्सेसनी आणि प्रभावी बॅकग्राऊंड म्युझिकमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. हा सिनेमा काहीतरी वेगळा आणि अधिक रोमांचक दिसतोय. मराठी सिनेसृष्टीने आजवर विविध विषय सखोल विचार करून हाताळले आहेत, मात्र हा सिनेमा एका नव्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या शैलीतून सादर करण्यात आलेला आहे.  

 मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सदागारा राघवेंद्र यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ या सिनेमात मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकार शिवानी सुर्वे, विराट मडके, प्रसाद खांडेकर, अश्विनी चावरे, शलाका पवार यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर, साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार कवीश शेट्टी आणि लोकप्रिय अभिनेत्री मेघा शेट्टी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकार एकाच सिनेमात एकत्र येऊन ज्या ताकदीने हे पात्र साकारणार आहेत, ते प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

ही बातमी वाचा : 

Anshuman Vichare : अंशुमन विचारे आणि हेमंत पाटील पहिल्यांदा दिसणार एकत्र, 'पाहिले न मी तुला' नाटकात करणार कल्ला  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माजSanjay Raut PC | लाडकी बहीण योजना फसवी, 5 लाख अर्ज बाद, राऊतांची सरकारवर टीकाBuranpur Gold Coin| छावा चित्रपट पाहून बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 खड्डेHarshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jonty Rhodes Catch Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
Video : जॉन्टी ऱ्होड्स, नाम तो सुना ही होगा! वयाच्या 55व्या वर्षी चित्त्यासारखी झेप घेत फिल्डिंग अन् अवघं स्टेडियम अवाक् झालं
International Women's Day 2025 : केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
केवळ अभिनयातच नाही तर व्यवसायातही 'या' सुंदरींचा बोलबाला; कमावतात कोट्यवधी रुपये; जाणून घ्या बॉलिवूडच्या बिझनेस वूमनबद्दल
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
छावा चित्रपट पाहिला अन् त्या किल्ल्यावर सोनं शोधण्यासाठी बायका पोरांसह अवघं गाव फुटलं!
Paduka Darshan Sohala 2025 : संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष, नेमकं प्रकरण काय? 
Vanuatu Citizenship : इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
इन्कम टॅक्स नाही, क्रिप्टोवाल्यांची चांदी! तालुक्याएवढी सुद्धा लोकसंख्या नसलेला देश अन् भारताच्या कैक पटीने 'वजनदार' पासपोर्ट; ललित मोदीने निवडलेल्या टीचभर देशाची कहाणी
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, 'माझा'च्या बातमीनंतर सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मविप्र संस्थाचालकांच्या अडचणी वाढणार?
Lalit Modi : बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
राशीनुसार योग्य रंगांनी धुळवड खेळा!
Embed widget