Aditya Roy Kapur : मला वायफळ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायला आवडत नाही, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच झाला व्यक्त
Aditya Roy Kapur : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्य रॉय कपूर पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.
Aaditya Roy Kapur : मागील अनेक दिवसांपासून आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर अनन्या पांडे हिच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळेही या चर्चांना दुजोरा मिळाला होता. त्यातच आता आदित्यने त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे आदित्य आणि अनन्या यांचं खरंच ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
अनेक कार्यक्रमांमध्ये आदित्य आणि अनन्या हे एकत्र दिसले होते. इतकंच नव्हे तर अनन्याच्या बहिणीच्या डोहाळजेवणाला देखील आदित्य हजर होता. पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. त्यामुळे आदित्य आणि अनन्या खरंच वेगळे झाले आहेत का? याबाबत अद्याप कोणातही खुलासा झालेला नाही.
आदित्य रॉय कपूरने नेमकं काय म्हटलं?
आदित्य रॉय कपूरने नुकतच Lifestyle Asi ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी भाष्य केलं आहे. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना म्हटलं की, मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कायमच शांत राहिलो आहे. कारण मला ते तसंच आवडतं. माझ्याबद्दल किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सगळ्यांनी सर्व काही जाणून घ्यावं, अशी माझी इच्छा नाही किंवा मला तसं वाटतंही नाही. म्हणूनच मी अनेक वैयक्तिक गोष्टी या माझ्यापर्यंतच ठेवतो. त्याचप्रमाणे मला वायफळ गोष्टींमध्ये वेळ घालवायला देखील आवडत नाही.
View this post on Instagram