Actress Rutuja Bagwe On Groupism In Marathi Industry: मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे? सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाली...
Actress Rutuja Bagwe On Groupism In Marathi Industry: बॉलिवूड असो वा मराठी इंडस्ट्री ... ग्रुपिझमचा बळी पडल्याचं अनेकांनी उघडपणे सांगितलं आहे. अशातच एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं केलेल्या वक्तव्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Actress Rutuja Bagwe On Groupism In Marathi Industry: फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. काहीजण ते करण्यात यशस्वी होतात, तर काहीजण प्रयत्न करतच राहतात. पण, इंडस्ट्रीत मोठा टप्पा गाठल्यानंतर, नाव कमावल्यानंतरही पुढे मोठ्या ग्रुपिझमचा सामना करावा लागतो. याबाबत आजवर अनेक अभिनेते (Actor), अभिनेत्रींनी (Actress) मन मोकळं केलं आहे. मग बॉलिवूड (Bollywood News) असो वा मराठी इंडस्ट्री (Marathi Film Industry)... ग्रुपिझमचा (Groupism In Marathi Industry) बळी पडल्याचं अनेकांनी उघडपणे सांगितलं आहे. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीला (Marathi Actress Rutuja Bagwe) याबाबत स्पष्ट विचारण्यात आलं. त्यावर अभिनेत्रीनं दिलेलं उत्तर खरंच हादरवणारं होतं.
अनेक मालिका (Marathi Serials) आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिनं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना खळबळजनक खुलासा केला. या मुलाखतीत ऋतुजाला मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ऋतुजानं दिलेल्या रोकठोक उत्तरानं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखत ऋतुजा बागवेन मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमवर थेट भाष्य केलं आहे.
View this post on Instagram
मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमवर ऋतुजा बागवे काय म्हणाली?
मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे म्हणाली की, "ग्रुपिझम आहेच, या काय कुठल्याही क्षेत्रात आहेच आणि ते असणारंच आहे. त्यामुळे मी त्याच्यावर रडत बसत नाही. माझा मूळ स्वभाव जास्त बोलका नसल्यामुळे मी या ग्रुपचा भाग होत नाही. कॉन्टॅक्ट्स मिळवणं, गप्पा मारणं काम मिळेपर्यंत थांबणं हा माझा स्वभाव नाही... ते चुकीचं आहे की, नाही पण मूळ स्वभावच तसा नसल्यामुळे मला हे सगळं करता येत नाही... सतत इव्हेंन्टस् अटेंड करा, सतत दिसत राहा वगैरे... तेही मला करायला आवडत नाही."
"स्वभावाचा भाग असल्यामुळे मी या गोष्टींमध्ये पडत नाही. त्यामुळे आपल्या हातात फक्त एकच उरतं जे मिळेल ते अगदी प्रामाणिकपणे करायचं की त्याची चार लोकांनी दखल घेतली पाहिजे. माझ्याबाबतीत असंच घडलं आहे आणि पुढेही असंच होत राहो. मला रातोरात मिळणारी प्रसिद्धीही नकोच. हळूहळू मिळालं तर चालेल. पण, मला असं काहीतरी काम करायचं आहे की ज्यामुळे लोक ओळखतील.", असं ऋतुजा बागवे म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























