Rajeshwari Kharat : 'शालू' कुणाकडे पाहून एवढं गोड हसतेय? कोण आहे तो? उत्तर मिळालं...
राजेश्वरीनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकरी फोटोमध्ये तिच्यासोबत असलेल्या तरुणाबाबत प्रश्न विचारत होते.
Rajeshwari Kharat : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. राजेश्वरी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. राजश्वरीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती एक तरुणाकडे पाहून हसताना दिसत आहे. राजेश्वरीनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेक नेटकरी फोटोमध्ये तिच्यासोबत असलेल्या तरुणाबाबत प्रश्न विचारत होते. एका नेटकऱ्यानं विचारलं, 'तो जब्या आहे का?' तर दुसरा म्हणाला, 'कोण आहे तो?' आता नेटकऱ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
फोटोमध्ये राजेश्वरीसोबत दिसणारा तरुण हा अभिनेता अरबाज शेख (Arbaj Shaikh) आहे. अरबाजनं एबीपी माझासोबत एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो राजेश्वरीसोबत दिसत आहे. त्यामुळे हा फोटो अरबाज आणि राजेश्वरीच्या आगामी चित्रपटातील आहे का? आणि राजेश्वरीनं हा फोटो सोशल मीडियावर का शेअर केला? या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळतील.
पाहा फोटो:
पाहा राजेश्वरीची पोस्ट
View this post on Instagram
अरबाज शेखचे चित्रपट
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटामुळे अरबाजला विशेष लोकप्रियता मिलाली. अरबाजनं या चित्रपटात सल्या ही भूमिका साकारली. सैराट या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. अरबाजनं फ्री हिट दणका, बस्ता या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर झुंड या हिंदी चित्रपटामध्ये देखील अरबाजनं महत्त्वाची भूमिका साकारली.
राजेश्वरीचे चित्रपट
सोमनाथ अवघडे नाटकात राजेश्वरीनं काम केलं. फॅंड्री या चित्रपटामुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात तिनं शालू ही व्यक्तीरेखा साकारली होती. 2014 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. इयत्ता 9 वीमध्ये असताना राजश्वेरीनं या चित्रपटात काम केलं.
हेही वाचा:
In Pics : शालूच्या नजरेनं कोण झालंय घायाळ? राजेश्वरीसोबत नेमकं आहे तरी कोण