अभिनेत्री मानसी नाईकच्या घटस्फोटीत पतीचा भीषण अपघात; ओला कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चुराडा
Actress Mansi Naik divorced husband accident : अभिनेत्री मानसी नाईकच्या घटस्फोटीत पतीचा भीषण अपघात; ओला कारने दिलेल्या धडकेत रिक्षाचा चुराडा

Actress Mansi Naik divorced husband accident : अभिनेत्री मानसी नाईक हिचा घटस्फोटीत पती प्रदीप अरोरा याचा भीषण अपघात झालाय. प्रदीप अरोरा रीक्षाने प्रवास करत होता. यावेळी ओला कारने तो प्रवास करत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिलीये. सुदैवाने प्रदीप अरोरा सुखरूप असून त्याला मोठी दुखापत झालेली नाही. सध्या रस्ते अपघातांची संख्या वाढत चालली आहे. काहीवेळा अनपेक्षितपणे अपघात घडतात, पण बहुतांशवेळा माणसाच्या बेजबाबदारपणामुळे किंवा चुकांमुळे लोकांना जीव गमवावा लागतो. अशाच एका घटनेत अभिनेत्री मानसी नाईकचा घटस्फोटीत पती प्रदीप खरेरा आणि त्याची सध्याची पत्नी अपघातग्रस्त झाले असून ते जखमी झाले आहेत.
प्रदीप खरेरा रिक्षातून प्रवास करत असताना, दारूच्या नशेत असलेल्या एका चालकाने रिक्षेला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप आणि त्याच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली, मात्र रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. प्रदीपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाची रिक्षाला धडक
प्रदीपने सांगितले की, तो आणि त्याची पत्नी विशाखा मुंबईत रिक्षाने प्रवास करत असताना एका ओला कारने त्यांच्या रिक्षेला धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे, कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता. प्रदीपने त्याला पकडल्यानंतर तो म्हणाला, “मी फक्त गाडी चालवायला शिकत होतो.” मात्र त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत होता आणि तो नीट उभाही राहू शकत नव्हता. प्रदीपने म्हटले की, देवाची कृपा असल्याने त्यांना मोठी दुखापत झाली नाही, परंतु रिक्षाचालक बेशुद्धावस्थेत होता.
View this post on Instagram
प्रदीपने पुढे सांगितले की, रिक्षाचालक अंदाजे 70 वर्षांचे होते. एवढ्या वयात ते कष्टाने रिक्षा चालवत होते. तो म्हणाला, “काका रडत होते. एवढ्या वयातही काम करत आहेत, म्हणजे त्यामागे काहीतरी मजबुरी असेल. तुमच्या दारूच्या नादामुळे एखाद्या चांगल्या माणसाचा जीव जाऊ शकतो.” प्रदीपने सर्वांना आवाहन केले की, दारू प्यायचीच असेल, तर घरी थांबा, बाहेर वाहन चालवू नका.
इतर महत्त्वाच्या बातम्या
साखळीपासून सुरु होणारी स्टोरी कुठल्या कुठं पोहोचते, अंगावर काटा आणणारा सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा























