एक्स्प्लोर

Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'

Actress Hansika Motwani on divorce: हंसिका मोटवानीने सोहेलसोबत घेतलेल्या काडीमोडबद्दल कारण सांगितलं.

Hansika Motwani On Divorce: बरेच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिने सोहेल खथुरियासोबत (Sohail Kathuria) लग्नगाठ बांधली. दरम्यान, लग्न झाल्यानंतर दोघांमध्ये सर्व काही अलबेल (Entertainment) सुरू नव्हतं.  लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. हंसिका आणि सोहेल या कपलने काडीमोड घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून हंसिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  नुकतेच अभिनेत्रीने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने सोहेल खथुरियासोबत घेतलेल्या घटस्फोटाबद्दल कारण सांगितले. तसेच विभक्त होण्यामागचे कारणही सांगितले.  

सोहेलसोबत घेतलेल्या घटस्फोटाबाबत हंसिका काय म्हणाली? (Hansika and Sohail Kathuria Divorce)

सोहेलसोबत घटस्फोट तसेच नकारात्मकतेबद्दल आपलं मत व्यक्त करत हंसिका म्हणाली, 'लोकांना लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी हव्या असतात.  सर्वांना चर्चेत राहायचं असतं.  मी यावर   कधीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.  मला या गोष्टींची पर्वा नाही. सर्व काही ठीक आहे. मला कोणताही पश्चाताप नाही. जर तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये चढला असाल, तर  त्रास सहन करण्यापेक्षा  ट्रेनमधून उतरणे केव्हाही चांगले. माझ्या कुटुंबाने मला साथ दिली आहे.   मी जिथे आहे, तिथे खूश आहे', असं हंसिका म्हणाली.

हंसिकाने सांगितले की, 'या कठीण काळात  आई आणि भाऊ माझ्यासोबत होते.  माझ्या आई आणि भावाने मला सांगितले की, जर तू या नात्यात  आनंदी नसेल तर, ते पुढे  सुरू ठेवण्यात अर्थ नाही. मला त्यांनी कठीण काळातून जाताना पाहिले आहे.  मी खूप आनंदी राहणारी व्यक्ती आहे. मी बऱ्याचदा नाराज आणि चिंतेत राहत होते. त्यामुळे मला त्यांनी सांगितले होते की,  जो काही तुझा निर्णय असेल, त्या निर्णयामागे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कुटुंबाचा पाठिंबा होता', असं हंसिका म्हणाली.

4 वर्षांच्या संसाराला काडीमोड, घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? (Hansika Motwani On Divorce)

'जेव्हा जे काही घडतं, तेव्हा ते फक्त दोन  व्यक्तींपुरतं मर्यादित असतं, आणि   त्यांनाच ते माहीत असतं.  तिसरी कोणतीही व्यक्ती त्यावर बोलू किंवा भाष्य करु शकत नाही', असं हंसिका म्हणाली.  हंसिका मोटवानी आणि सोहेल खथुरियाने डिसेंबर  2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. जयपूरच्या मुंडोता  फोर्ट एंड पॅलेजमध्ये त्यांनी लग्न केलं.  मात्र, गेल्या वर्षी त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीतरी बिनसल्याच्या अफवा पसरु लागल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget