एक्स्प्लोर

Actor Wife Poisoned Him: पत्नीनंच अभिनेत्याला पाजलं विष, बालपणीचा मित्रही बायकोला मिळाला; प्रॉपर्टी हडपली अन् मुलासह गायब झाली

Actor Sandeep Anand Wife Poisoned Him: 'एफआयआर' आणि 'मे आय कम इन मॅडम' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत.

Actor Sandeep Anand Wife Poisoned Him: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ते एक मायाजाल असल्याचं आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर, सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणंही आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत (Glamorous World) आपलं नाव कमावणासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोनं त्याच्यासोबत असं काही केलं की, तो त्या धक्क्यातून कदाचितच सावरेल. 

'एफआयआर' (FIR) आणि 'मे आय कम इन मॅडम' (May I Come in Madam?) यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला (Sandeep Anand) त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळालंय. त्याच्या वैवाहिक आयुष्यात जे काही घडलं, हे जाणून तुम्हीही हादरुन जाल. त्याला त्याच्या स्वतःच्या पत्नीनंच उद्ध्वस्त केलं. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, संदीपचा बालपणीचा अत्यंत जीवलग मित्रही पत्नीसोबत कटात सहभागी होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदीप आनंदनं अरेंज-मॅरेज केलेलं, त्याला एक मुलगाही आहे. पण, पत्नी त्याच्यासोबत विषप्रयोग करुन मुलाला घेऊन पळून गेली. आजही संदीप पोटच्या मुलाला भेटण्यासाठी आसूसला आहे. 

पत्नी जेवणातून द्यायची स्लो पॉयझन

अभिनेता संदीप आनंदनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, त्यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्यानं या लग्नाला विश्वासघात म्हणून संबोधलं. लग्नापूर्वी तो त्या मुलीला फक्त 2-3 वेळाच भेटलेला, असं अभिनेत्यानं सांगितलं. लग्नानंतर तो मुंबईत आला, त्यावेळी करिअरच्या नादात त्याला घरात जास्त वेळ देता येत नव्हता. याचाच गैरफायदा त्याच्या पत्नीनं घेतला आणि त्याला विषाचा घोट पाजला. 

संदीप 'मे आय कम इन मॅडम' मध्ये काम करत असतानाच, त्याची प्रकृती हळूहळू बिघडायला सुरुवात झालेली. त्याच्या प्रकृतीत विचित्र बदल झाले, त्याचं वजन अचानक वाढायला लागलं होतं. शरीर थकू लागलं होतं, आणि मानसिकदृष्ट्याही तो कोलमडत चालला होता. त्याच्या जेवणात स्लो पॉयझन मिसळलं जात होतं, याचा उलगडा अभिनेत्याला बऱ्याच दिवसांनी झाला. 

घटस्फोटानंतर दोन वर्षांनी, अभिनेत्याला कळलं की, त्याचा बालपणीचा मित्र देखील त्याच्या पत्नीसोबतच्या कटात सामील होता. सध्या त्याचा बालपणीचा मित्र, अभिनेत्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि मुलासह गायब आहे. धक्कादायक म्हणजे, संदीपचा दावा आहे की, त्याचा मित्र त्याच्या पत्नीशी जवळीक वाढवून त्याला संपवण्याचा डाव आखत होता. दरम्यान, घटस्फोटाच्या वेळी, अभिनेत्यानं त्याची सर्व मालमत्ता त्याच्या पत्नीला पोटगी म्हणून दिली होती आणि स्वतः आश्रमात दिवस घालवू लागला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

TV Actress Life : दोन लग्न मोडली, पोटच्या मुलीच्या कस्टडीसाठी 'या' अभिनेत्रीनं नवऱ्यालाच 93 लाखांची पोटगी दिली, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Killekar Video Suraj Chavan Sanjana: 'आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..' जान्हवी किल्लेकरनं भरली संजनाची चोरओटी! Video शेअर करत म्हणाली..
'आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..' जान्हवी किल्लेकरनं भरली संजनाची चोरओटी! Video शेअर करत म्हणाली..
Popular Hollywood Film: 'हा' चित्रपट पाहण्यासाठी खिसा सैल करावा लागणार! एका तिकिटासाठी मोजावे लागतायत तब्बल 3,300 रुपये; काही मिनिटांत शो हाऊसफुल
'हा' चित्रपट पाहण्यासाठी खिसा सैल करावा लागणार! एका तिकिटासाठी मोजावे लागतायत तब्बल 3,300 रुपये; काही मिनिटांत शो हाऊसफुल
Pranit More Delete Instagram Page: 'त्या' व्हिडीओनंतर प्रचंड टीकेची झोड, प्रणित मोरेचा इन्स्टाग्राम पेजबाबत मोठा निर्णय, डायरेक्ट पेजच....
'त्या' व्हिडीओनंतर प्रचंड टीकेची झोड, प्रणित मोरेचा इन्स्टाग्राम पेजबाबत मोठा निर्णय, डायरेक्ट पेजच....
Nikhil Chavan-Anushka Sarkate Kelvan: 'कारभारी लईभारी' फेम अनुष्का- निखिलची लगीनघाई;  भरत जाधवांसह कलाकारांनी घातलं केळवण; भन्नाट उखाणे व्हायरल
'कारभारी लईभारी' फेम अनुष्का- निखिलची लगीनघाई;  भरत जाधवांसह कलाकारांनी घातलं केळवण; भन्नाट उखाणे व्हायरल

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget