ऑर्डर ऑर्डर...बॉलिवूडमधील 300 सिनेमांमध्ये निभावली न्यायाधीशांची भूमिका, तर मुलगा बनला थरकाप उडवणारा खलनायक
Actor Murad : ऑर्डर ऑर्डर...बॉलिवूडमधील 300 सिनेमांमध्ये निभावली न्यायाधीशांची भूमिका, तर मुलगा बनला थरकाप उडवणारा खलनायक

Actor Murad : बॉलिवूडमध्ये कोणाला सहजासहजी संधी मिळत नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी आजवर अनेकांना मोठा संघर्ष करावा लागलाय. मात्र, एका अभिनेत्याची गोष्ट निराळीच आहे. ही गोष्ट आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची. ज्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं, पण कधीच मुख्य भूमिका साकारू शकले नाहीत. अभिनय क्षेत्रातील अनेकांचे ते गुरू होते, पण कधीच सुपरस्टारसारखी मुख्य भूमिका मिळाली नाही. मात्र त्यांच्या प्रतिभेचं हे सामर्थ्य होतं की त्यांच्याकडे कधीच कामाची कमतरता भासली नाही. त्यांनी भरपूर काम केलं आणि आपली ओळख कॅरेक्टर रोल्समधूनच निर्माण केली. आज अशाच एका दमदार अभिनेत्याची गोष्ट जाणून घेऊयात...
मुराद यांची भाची म्हणजे अभिनेत्री झीनत अमान
आपण बोलतोय अभिनेते हमीद अली मुराद यांच्याबद्दल ... ज्यांना सर्वजण ‘मुराद’ या नावाने ओळखतात. त्यांना तुम्ही याच नावाने ओळखू शकता की ते रझा मुराद यांचे वडील आहेत. रझा मुराद हे बॉलिवूडमधील भयावह खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी निगेटिव्ह रोलमधून खूप नाव कमावलं. मुराद यांची भाची म्हणजे अभिनेत्री झीनत अमान असून त्यांचे नाते अभिनेत्री सोनम आणि सनोबर कबीर यांच्याशी देखील आहे.
मुराद हे मूळचे कुठले होते? मुराद यांनी 1940 पासून 1990 पर्यंत अभिनय केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्वाधिक वडील, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीशाच्या भूमिका साकारल्या. एका रिपोर्टनुसार, त्यांनी सुमारे 500 चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यातील 300 चित्रपटांमध्ये ते एकसारख्या भूमिका, विशेषतः जजच्या भूमिकेत दिसले.
मुराद यांचे निधन कसे झाले?
मुराद यांचे निधन 24 एप्रिल 1997 रोजी झाले. तेव्हा त्यांचे वय 86 वर्षे होते. एका मुलाखतीत रझा मुराद यांनी सांगितले होते की 1981 साली त्यांच्या वडिलांना पक्षाघात (लकवा) झाला होता. या आजारामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ते व्यवस्थित चालू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी 1987 मध्ये चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली. मात्र त्यानंतरही काही चित्रपट प्रदर्शित झाले, जे त्यांनी निवृत्तीनंतर पूर्ण केले होते.
Ver esta publicación en Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
वाट्टोळं होईन जाईन तुझं, वाट्टोळं..... भीतीने हादरवून टाकणारा जारण सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का?
रात्रीस खेळ चाले फेम 'शेवंताचा' घटस्फोट होऊन 10 वर्षे उलटली, आता म्हणाली, लग्न करायचंय!























