एक्स्प्लोर

Govinda Event Bouncer Paparazzi Fight Viral Video: 'हाथ मत लगाओ...', गोविंदाचे बाउंसर आणि पॅपाराझी आपापसांत भिडले, गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचल्या; धक्क्दायक VIDEO व्हायरल

Govinda Event Bouncer Paparazzi Fight Viral Video: एका इव्हेंटमध्ये गोविंदाचे बाउन्सर्स आणि पॅपाराझींमध्ये मोठा राडा, व्हिडीओ तुफान व्हायरल

Govinda Event Bouncer Paparazzi Fight Viral Video: नव्वदच्या दशकात आपली भन्नाट डान्स स्टाईल आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगमुळे बॉलिवूडवर (Bollywood News) अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार गोविंदा (Actor Govinda) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. कधी तो त्याची बायको सुनीता अहुजा (Sunita Ahuja) हिनं केलेल्या वक्तव्यांवर स्पष्टीकरण देताना दिसतो, तर कधी त्याच्याबाबत पसरलेल्या अफवांवर उत्तर देताना दिसतो. यावेळी मात्र, गोविंदा वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. गोविंदाच्या एका इव्हेंटमध्ये मोठा गोंधळ झाला आहे. 

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गोविंदा स्टेजवर मॉडेल्ससोबत आपल्या जुन्या अंदाजात ठेका धरताना दिसतोय. चाहत्यांना त्याची तीच जुना 'चीची स्टाईल' पुन्हा पाहायला मिळाल्यानं अनेकांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र, याच कार्यक्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं आहे. ज्यामध्ये त्याचे बाऊन्सर्स आणि पॅपाराझी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली असून गोष्टी थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचं दिसून येतंय, ही घटना एका कार्यक्रमादरम्यान घडली. 

गोविंदाचे बाऊन्सर्स, पॅपाराझी यांच्यात मोठा वाद (Govinda Bouncers Paparazzi Fight Viral Video)

सुपरस्टार गोविंदा सोमवारी रात्री एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला. या कार्यक्रमात त्यानं काळ्या रंगाचा सूट वेअर केलेला दिसून आला. गोविंदानं या कार्यक्रमात अत्यंत उत्साहानं डान्स केला, गोविंदाला पुन्हा त्याच्या नव्वदीच्या अंदाजात पाहून चाहते भलतेच खूश झाले. त्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, यापैकी एका विशिष्ट व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण यामध्ये गोविंदाचे बाऊन्सर्स पॅपाराझींवर संतापल्याचं पाहायला मिळतंय.  

मोठ्या राड्यानंतर गोविंदानं काय केलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये गोविंदाचे बाऊन्सर्स आणि इव्हेंटसाठी उपस्थित असलेल्या पॅपाराझींमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसलं. फोटो आणि व्हिडीओ काढण्यावरून हा वाद सुरू झाला आणि परिस्थिती इतकी चिघळली की, बाऊन्सर्सनी पॅपाराझींना रोखण्यासाठी हात लावला आणि मोठा गोंधळ झाला. यावेळी गोविंदा तात्काळ तिथे पोहोचला आणि त्यानं शांतपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं स्वतःच्या बाऊन्सर्सना आणि पॅपाराझींनाही शांत राहण्याचं आवाहन केलं. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by P@L@$h (@pop_artist_dude)

गोविंदाच्या या शांत आणि संयमी स्वभावाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. "योग्य केलं", "गोविंदा खूप शांत स्वभावाचे आहेत" तसेच "तो खरा जेंटलमन आहे", अशा प्रतिक्रिया युजर्सकडून समोर येत आहेत.

दरम्यान, गोविंदा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. 208 मध्ये प्रदर्शित झालेल्या रंगीला राजा या सिनेमात गोविंदा शेवटचा झळकला होता. मात्र, विविध इव्हेंट्स आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तो कायम दिसत असतो.

अभिनयासोबतच गोविंदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. त्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्यासोबतच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगताना दिसतात. दोघे वेगळं राहत असल्याच्या आणि घटस्फोटाच्या चर्चाही अधूनमधून समोर येत असतात. सुनीता आहुजा अनेक मुलाखतींमध्ये गोविंदांवर मिश्कील टोले लगावताना दिसली आहे. तसेच, तिनं कित्येकदा गोविंदाच्या कथित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबतही भाष्य केलं आहे. मात्र, गोविंदांनं हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Embed widget