Amitabh Bachchan Post : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट प्रदर्शित होताच अमिताभ बच्चन भावूक; म्हणाले...
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत.
Amitabh Bachchan Tweet : प्रेक्षक अभिषेकच्या घूमर चित्रपटाची मोठ्या आतूरतेने वाट पाहत होते. आज अभिषेक बच्चनचा चित्रपट अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिषेकचे चित्रपट फक्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत होते. याआधी अभिषेकचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. अभिषेकचा चित्रपट रिलीज झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी पोस्ट शेअर करून अभिषेकचे अभिनंदन केले आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे. "आपण प्रत्येकाने अपयशाचा सामना केला आहे. तेव्हा भावना काय असतात आपल्याला माहिती आहेत. पण जेव्हा विजेता यशस्वी होतो. तेव्हा काय भावना असतात. हे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. या तरुण वयात आणि या काळात तू खूप छान अभिनय केला आहेस. तसेच, गुंतागुंतीची व्यक्तिरेखा तू साकारली आहेस. आज एक वडील म्हणून मला अभिमान वाटतोय."
T 4741 - Abhishek I can say this as a Father, yes, but also as a member of the fraternity we both belong to ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 17, 2023
At this young age and in the time period, you have performed in the most complex characters in film after film .. all different convincing and all successful .. ❤️
अभिषेकची प्रतिक्रिया काय?
अभिषेक बच्चनने वडील अमिताभ यांच्या पोस्टला उत्तर दिले आहे. त्याने अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला लव्ह यू पा, असं म्हणत रिप्लाय केला आहे.
अभिषेक बच्चनच्या 'घुमर' चित्रपटाबाबत जाणून घ्या
अभिषेक बच्चनचा बहुचर्चित 'घुमर' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महिला क्रिकेटर अनिनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर (Saiyami Kher) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिषेक क्रिडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आर. बाल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक आणि सैयामीसह शिवेंद्र सिंह आणि इनवाका दासही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकला खास पोस्ट शेअर करत 'घुमर'साठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीदेखील झलक पाहायला मिळणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी नुकताच अभिषेकचा घूमर चित्रपट पाहून अश्रू अनावर झाल्याचा खुलासा केला होता, त्यांनी लिहिले होते "दोन वेळा सिनेमाा पाहिला. रविवारी दुपारी आणि रात्री. तुमचा मुलागा संबंधीत गोष्टीचा भाग असेल तर ते अविश्वसनीय असतं. तुम्ही स्वतःची नजर देखील हटवू शकत नाही. सिनेमा पाहिल्यानंतर मी माझे विचार तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय स्वतःला थांबवू शतक नाही. माझे डोळे पाणावले आहेत."
इतर महत्वाच्या बातम्या