एक्स्प्लोर

Abhijit Bichukale :'डॉक्टर' अभिजीत बिचुकले! आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्यासाठी दिल्लीच्या विद्यापीठाने दिली पदवी

Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले यांना दिल्लीच्या मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे.

Abhijit Bichukale :  अभिजीत बिचुकेल (Abhijit Bichukale) सिर्फ नामही काफी हैं म्हणत ते कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना विशेष पसंती मिळाली. त्यातच बिग बॉस मराठीतील त्यांच्या एन्ट्रीमुळे अभिजीत बिचुकले आता घरोघरी पोहचले. त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच हास्यकल्लोळ माजतो. कधी राजकारणातल्या एन्ट्रीमुळे तर कधी पंतप्रधान बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने अभिजीत बिचुकले हे नाव चर्चेच्या कायमच अग्रस्थानी राहिलं. पण पुन्हा एकदा हे नाव पुढं आलं आहे. कारण अभिजीत बिचुकले आता त्यांच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावणार आहेत. 

अभिजीत चुकले आता डॉक्टर अभिजीत बिचुकले झाले आहेत.दिल्लीच्या मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना ही पदवी देण्यात आलीये. आजवरचं आर्ट आणि नाट्य क्षेत्रातील कार्य पाहून ही पदवी दिली असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं.त्यामुळे पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले हे चर्चेचा विषय ठरले आहेत. 

अभिजीत बिचुकले लोकसभेच्या रिंगणात 

दरम्यान अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा सातारकरांसाठी पुन्हा खास ठरणार असल्याची चित्र आहेत. एबीपी माझासोबत बोलताना अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं की, लोकांनी मला मतदान करावं मी नक्कीच विकास करेन. मला कुठल्याही पक्षात जाण्याची गरज नाही. माझ्याकडेच अनेक लोक येणार आहे. मी कुठेही गेलो तरी अनेक लोक माझ्याजवळ येऊन फोटो, सेल्फी काढतात .मात्र मतदान का करत नाही हा प्रश्न मलाही पडतोय.

बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले

बिग बॉस -15 (Bigg Boss 15) मध्ये अभिजीत बिचुकले यांनी सहभाग घेतला होता. अभिजीत बिचुकले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.  सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला, असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला होता. अभिजीत बिचुकले हे विविध विषयांवरील त्यांची मतं मांडत असतात. अभिजीत बिचुकले हे मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील सहभागी झाले होते.

अभिजीत बिचुकले कायम चर्चेत!

'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बिचुकलेंनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेंना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती. 

ही बातमी वाचा : 

Priya Bapat : 'तेव्हाचा राग अजुनही माझ्या मनात तसाच आहे', प्रिया बापटने सांगितला आयुष्यातला 'तो' भयनाक किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget