Anand Mahindra, Rohit Shetty : आनंद महिंद्रा यांचे ट्वीट चर्चेत; म्हणाले, 'रोहित शेट्टी, ही गाडी उडवायला तुम्हाला अणुबॉम्ब वापरावा लागेल'
नुकतेच आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक ट्वीट केले आहे.

Anand Mahindra, Rohit Shetty : भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra)हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सला ते रिप्लाय देतात. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N ) ही गाडी 27 जून रोजी लॉन्च होणार आहे. यापूर्वी त्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरबाबत एका यूजरने आनंद महिंद्रा यांना टॅग करत एक मीम शेअर केला आहे. या मीममध्ये जॉनी लिव्हरचा प्रसिद्ध डायलॉग- अब मजा आएगा बिडू असं लिहिलेलं दिसत आहे. त्या नेटकऱ्यानं कॅप्शनमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला की बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी ही गाडी उडवायचा प्रयत्न करेल. या नेटकऱ्याच्या ट्वीटला आनंद यांनी रिप्लाय दिला, 'रोहित शेट्टी जी, ही गाडी उडवण्यासाठी तुम्हाला अणुबॉम्ब लागेल.'
Rohit Shetty ji, is gaadi ko udaane ke liye aap ko ek nuclear bomb ki aavashyakata hogi…🙂 #BigDaddyOfSUVs #MahindraScorpioN https://t.co/wfmVihUvoE
— anand mahindra (@anandmahindra) May 21, 2022
दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या चित्रपटामध्ये गाड्यांचे वेगवेगळे स्टंट दाखवत असतो. त्यामुळे त्या नेटकऱ्यानं तसं ट्वीट केलं. पण आनंद महिंद्रा यांच्या रिप्लायनं सर्वांचे लक्ष वेधले. Mahindra Scorpio-N या गाडीचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला असून, त्याच्या टीझरला बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे.
'स्कॉर्पियो एन' मधील फिचर्स
नव्या स्कॉर्पिओला पॉवर देण्यासाठी त्यात 2.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येईल. तसेच 2.2 लीटर एमहॉक इंजिन देखील यामध्ये मिळू शकते जे, 3,750rpm वर 130bhpची पॉवर आणि 1,600 ते 2,800rpm मध्ये 300Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्स पर्यायांसह लॉन्च केले जाईल.
संबंधित बातम्या
- Ankush Choudhary : केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
-
Kedar Shinde : शाहीर साबळेंनी सिनेमातील गाणी का गायली नाहीत? केदार शिंदेंनी शेअर केली पोस्ट
-
Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर हास्याची मेजवानी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता पाच दिवस पाहता येणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
