एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'जुग जुग जिओ' ट्रेलर रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता वरुण धवन  सध्या त्यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

‘पृथ्वीराज’ सिनेमा पुन्हा चर्चेत; सिनेमाचं नाव बदला, करणी सेनेची मागणी

खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा बहुचर्चित 'पृथ्वीराज' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. करणी सेनेने या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. 

कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ प्रेक्षकांना आवडला! दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली चित्रपटाची जादू!

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2'  बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू दिसते आहे. शुक्रवारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 'भूल भुलैया 2' चित्रपटाने 14.11 कोटींचा व्यवसाय केला.

कंगनाकडून भूल भुलैय्या-2 चं कौतुक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा भूल भुलैय्या-2  हा चित्रपट  20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहेत. हॉरर कॉमेडीवर आधारित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटींची देखील मनं जिंकत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. आता 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' कंगना रनौतनं देखील या चित्रपटाचं कौतुक केलं असून एक खास पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली. 

'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' सिनेमाचे पोस्टर रिलीज

आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला आता सुरुवात झाली आहे. हा फेस्टिवल 28 मे पर्यंत असणार आहे. यंदाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये वेगवेगळे कार्यक्रमदेखील राबवले जात आहे. या फेस्टिवलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. हा फेस्टिवल भारतासाठी खूपच खास आहे. 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये हिना खानच्या आगामी 'कंट्री ऑफ द ब्लाइंड' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. 

गिरिश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमातील ‘लाईन दे मला’ गाणं रिलीज

'भिरकीट' हा सिनेमा 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.  धमाल विनोदी आणि कौटुंबिक नाते यांच्या सोबतच या सिनेमात प्रेक्षकांना जबरदस्त संगीत ऐकायला मिळणार आहे. आता सिनेमातील ‘लाईन दे मला’ हे गाणं रिलीज झालं आहे. 

'मस्तानी'च्या नेकनेसची रंगलीये चर्चा, किंमत ऐकून व्हाल अवाक्

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या वेगवेगळ्या लूक्सनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे. या फेस्टिव्हलची ती ज्युरी आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नुकताच दीपिकानं क्लासी लूक केला होता. ब्लँक कलरचा सूट आणि गळ्यामध्ये एक पँथरची डिझाइन असलेला नेकलेस असा लूक दीपिकानं केला होता. दीपिकाच्या नेकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये आहे. हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केला आहे. हे सर्व मिळून हा नेकलेस  19.05 कॅरेटचा आहे.

पॉप स्टार Modonna ला इंस्टाग्रामने लाईव्ह जाण्यास केलं बॅन; जाणून घ्या कारण...

हॉलिवूडची पॉप स्टार मॅडोना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या संगीतासोबतच ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे 18 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. याचाच अर्थ सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. पण आता मॅडोना आणि तिच्या चाहत्यांनाही मोठा झटका बसला आहे. इंस्टाग्रामने मॅडोनाला लाईव्ह जाण्यास बंदी घातली आहे. 

'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शिरीष लाटकर लिखित 'योगयोगेश्वर जय शंकर'  ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 30 मे पासून ही मालिका सुरू होत आहे. पार्वतीबाई आणि शंकर महाराज यांच्या नात्यावर भाष्य करणारी 'योगयोगेश्वर जय शंकर' ही मालिका आहे. मालिकेमध्ये शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका उमा पेंढारकर साकारणार आहे.

सलमानच्या चित्रपटातून आयुष शर्मा आऊट! 

बॉलिवूडमधील अनेक बिग बजेच चित्रपट सध्या रिलीज होत आहेत तर काही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता सलमान खानचा कभी ईद कभी दिवाली हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानची बहिण अर्पिताचा पती  आयुष शर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार होता. पण रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये आता आयुष हा काम करणार नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget