IPL 2025 Final Match, RCB vs PBKS: IPL 2025 फायनलसाठी 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, भोजपुरी सुपरस्टारसोबत बजावणार महत्त्वाची भूमिका
Aamir Khan To Join IPL 2025: आमिर खान त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, तो आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याचाही भाग असेल, जिथे आमीर खानची अनोखी शैली पाहायला मिळेल.

Aamir Khan To Join IPL 2025: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट 20 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान, आमिर खान आयपीएलच्या (IPL 2025 Final Match) अंतिम सामन्याला उपस्थित राहणार आहे. या दरम्यान, मिस्टर परफेक्शनिस्ट एका भोजपुरी सुपरस्टारसह भोजपुरीमध्ये कॉमेंट्री करणार आहे.
आयपीएल 2025 चा अंतिम सामना मंगळवार, 3 जून रोजी सायंकाळी 7:30 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे, ज्यासाठी आमिर खान उपस्थित राहणार आहे. बॉलिवूडटा मिस्टर परफेक्शनिस्ट भोजपुरी सुपरस्टार रवी किशनसोबत भोजपुरी कॉमेंट्री बॉक्समध्ये सामील होणार आहे.
रवी किशनसोबत भोजपुरी कॉमेंट्री करणार
जियो हॉटस्टारनं एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान आणि रवी किशन एकत्र दिसत आहेत. या प्रोमोसोबत लिहिलंय की, "भोजपुरिया इफेक्टला नुकताच एक ब्लॉकबस्टर ट्विस्ट मिळाला आहे. आमिर खान आयपीएलच्या अंतिम सामन्यात सहभागी होत आहे आणि भोजपुरी कॉमेंट्री बॉक्स त्याचा पुढचा स्टॉप असू शकतो. पुढे काय होणार? याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? त्याला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाहा."
'पीके' चित्रपटातील भोजपुरी डायलॉग्सनं आमिरनं सर्वांवर छाप सोडलेली
रवी किशनने यापूर्वी आमिर खानसोबत काम केलं आहे. त्यांनी अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवलेल्या 'मिसिंग लेडीज' या हिट चित्रपटात काम केलं. त्याचबरोबर, आमिर खान पडद्यावर भोजपुरी बोलताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, सुपरस्टारनं 2014 मध्ये आलेल्या 'पीके' चित्रपटातही भोजपुरीमध्ये डायलॉग्ज बोलले होते, जे प्रेक्षकांना खूपच आवडलेले.
View this post on Instagram
'सितारे जमीन पर'मुळे आमिर खान चर्चेत
आमिर खानचा आगामी सिनेमा 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आमिरच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं तर, या चित्रपटाद्वारे आमिर खान तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सुपरस्टार शेवटचा 2022 मध्ये आलेल्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसला होता. जेनेलिया देशमुख त्याच्यासोबत 'सितारे जमीन पर'मध्येही दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























