Nupur Shikhare : अरेच्चा! आमिर खानचा जावई खातोय आईकडून झाडूचा मार, सोशल मीडियावर धम्माल व्हिडीओ व्हायरल
Nupur Shikhare : आमिर खानचा जावई नुपूर शिखरे आणि त्याची आई प्रीतम शिखरे यांचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Nupur Shikhare : आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) हिने काही दिवसांपूर्वी नुपूर शिखरेसोबत (Nupur shikare) लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर आमिर खानचा जावाई बराच चर्चेत आला होता. पण आणखी एका कारणामुळे नुपूर हा कायमच चर्चेत असतो. नुपूर आणि त्याची आई प्रीतम शिखरे यांचे सोशल मीडियावर फार मजेशीर रिल्स व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये आमिर खानचा जावाई नुपूर शिखरे हा चक्क आईच्या हातचा मार खाताना दिसतोय.
अनेक मजेशीर विषयांवर नुपूर आणि त्याची आई रिल्स करत असतात. त्यांच्या रिल्सवर अनेक कमेंट्सही येत असल्याचं पाहायला मिळतंय. पण नुकत्याच केलेल्या या रिलमध्ये नुपूरला त्याची आई झाडूचा मार देते. यावर अनेकांनी कमेंट्स करत हसण्याचे इमोजी पाठवले आहेत.
नुपूरचा रिल नेमका काय आहे?
नुपूरची आई प्रीतम खोली आवरत असताना कचरा काढत असते. त्यावेळी त्या नुपूरला कपाटावरची बॅग काढून द्यायला सांगतात. त्यावर नुपूर म्हणतो की, सपने देखणा अच्छी बात हैं, पण सपनों के साथ सो जाना अच्छी बात नहीं हैं... त्यावर त्याची आई त्याच्यावर चिडते आणि थेट झाडून फकटे देते.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी मुंबईत रजिस्टर मॅरेज केले. उदयपूरमध्ये आयरा आणि नुपूर यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं. या जोडप्याचे रिसेप्शन नंतर मुंबईत आयोजित करण्यात आले होते.
आयराचा होणारा पती नुपुर शिखरेचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला आहे. नुपुर हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. नुपूर आणि आयरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अशताच त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट केली. त्यानंतर आयरा आणि नुपूर यांनी उदयपूरमध्ये ख्रिचन पद्धतीनं लग्न केलं.
View this post on Instagram