पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानची प्रतिक्रिया, म्हणाला; 'मोदी सरकार...'
Aamir khan on pahalgam attack : पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानची प्रतिक्रिया, म्हणाला; 'मोदी सरकार...'

Aamir khan on pahalgam attack :बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir khan) आज (6 मे) दिल्ली येथे झालेल्या एबीपी नेटवर्क इंडिया @2047 समिटमध्ये सहभागी झाला. यावेळी अभिनेत्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी त्याने काही दिवसांपूर्वी पहलगाम ( pahalgam attack) येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच काहीतरी करतील - आमिर खान
आमिर खान म्हणाला की, आमचा असा विश्वास आहे की तिथे जे काही घडले ते पंतप्रधान मोदींवर सोडले पाहिजे. तो नक्कीच काहीतरी करतील. ते म्हणाले आहेत की लोकांना न्याय मिळालाच पाहिजे.
पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोदी सरकारवर विश्वास ठेवावा - आमिर खान
पहलगाम हल्ल्याच्या प्रश्नावर, अँकरने आमिर खानला विचारले की आपण पाकिस्तानकडून बदला घ्यावा असे त्याला वाटते का? यावर उत्तर देताना आमिर खान म्हणाला की, पहलगाममध्ये जे काही घडले ते खूप चुकीचे होते. निष्पाप लोक मारले गेले, जे अजिबात सहन केले जाऊ शकत नाही. पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोदी सरकारवर विश्वास ठेवावा, असंही आमिर खान म्हणालाय. मोदी नक्कीच काहीतरी करतील आणि हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे, म्हणून मी यावर काय बोलावे? मला वाटते की हे सरकारवर सोपवले पाहिजे. ते या दहशतवादी हल्ल्यामुळे पीडित झालेल्यांना नक्कीच न्याय देतील.
एबीपी प्लॅटफॉर्मवर आमिर खानने त्याच्या आगामी सितारे जमीन पर या चित्रपटाबद्दलही भाष्य केलं. त्याने सांगितले की, यात त्याचे पात्र गुलशनचे असणार आहे, जे तारे जमीन परमधील शिक्षक निकुंभपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे. आमिर खानने असेही सांगितले की त्याचे पात्र प्रत्यक्षात एका प्रशिक्षकाचे आहे. ज्याचे विद्यार्थी त्याच्यावर चिडतात कारण गुलशन खूप भांडखोर आहे. चित्रपटाच्या थीमबद्दल बोलताना आमिर म्हणाला,हा चित्रपट त्याच्या पहिल्या भागाची थीम पुढे नेईल परंतु अधिक मनोरंजक पद्धतीने.
इतर महत्त्वाच्या बातम्या























