एक्स्प्लोर

Actress Gautami Kapoor Molested: ‘त्यानं माझ्या पॅन्टमध्ये हात घातला...’; मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला धक्कादायक किस्सा

Actress Gautami Kapoor Molested: टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूर तिच्या शालेय जीवनात अत्यंत भयानक घटनेला बळी पडली होती, ज्याबद्दल ऐकलं तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

Actress Gautami Kapoor Molested: टेलिव्हिजन स्टार गौतमी कपूरनं (Gautami Kapoor) आपल्या लहानपणीचा एक हादरवणारा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्रीच्या लहानपणी तिच्यासोबत हादरवणारं कृत्य घडलेलं. त्यानंतर ती फारच घाबरलेली, हा प्रसंग तिनं आपल्या आईलाही सांगितलेला. 

टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूर (TV actress Gautami Kapoor) तिच्या शालेय जीवनात अत्यंत भयानक घटनेला बळी पडली होती, ज्याबद्दल ऐकलं तर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गौतमी कपूरनं खुलासा केला की, लहान असताना शाळेतून घरी परतत असताना एकदा बसमध्ये तिच्यासोबत अत्यंत अश्लील कृत्य घडलं होतं. ती तिच्या शाळेच्या गणवेशात होती आणि एका अनोळखी व्यक्तीनं अचानक तिच्या पँटमध्ये हात घातला. त्या घटनेनं अभिनेत्री खूपच घाबरलेली. त्यावेळी ती फक्त 12 वर्षांची होती. घरी पोहोचताच अभिनेत्रीनं तिच्या आईलाही याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी गौतमी फारच घाबरली होती, त्यावेळी तिच्या आईनं अन्याय सहन न करता चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं होतं.

खरंतर, गौतमी कपूरनं अलीकडेच हॉटरफ्लायशी (Hautterfly) संवाद साधला. यावेळी तिला विचारण्यात आलं की, ती मुंबईला शहर म्हणून किती सुरक्षित मानते? यावर उत्तर देताना गौतमी म्हणाली होती की, ती मुंबईशी भावनिकदृष्ट्या जोडलेली आहे, म्हणून ती थोडीशी बायस्ड आहे. ती म्हणाला की, मुंबई शहरानं तिला खूप काही दिलंय आणि ती सुरक्षित आहे. यासोबतच, अभिनेत्रीनं सांगितलं की, त्यावेळी तिच्या कुटुंबाकडे गाडी नसल्यानं ती वयाच्या पाचव्या वर्षापासून बसनं प्रवास करत होती.

“त्यानं थेट माझ्या पँटमध्ये हात टाकला...”

गौतमीनं आपल्या लहानपणी घडलेल्या भयानक घटनेबाबत बोलताना सांगितलं की, ज्यावेळी ती सहावीत होती, त्यावेळी एकदा ती शाळेतून बसनं घरी जात होती. ती शाळेच्या गणवेशातच होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीनं तिच्या पँटमध्ये हात टाकला. त्यावेळी ती फारच लहान होती.  फक्त 12 वर्षांची होती. फारच लहान असल्यामुळे तिला आधी हे समजून घ्यायला वेळ लागला की, तिच्यासोबत नेमकं घडतंय काय? तसेच, अचानक घडलेल्या घटनेमुळे ती पुरती भांबावली होती. लगेच बसमधून खाली उतरली. त्यानंतर आपल्यासोबत काय घडलंय हे कळायलाच तिला 15 ते 20 मिनिटं लागली. तिला भिती वाटली की, ती व्यक्ती तिचा पाठलाग तर करणार नाही. 

गौतमीनं घरी जाऊन आईला सगळं सांगितलं... 

गौतमी कपूरनं पुढे बोलताना सांगितलं की, घरी पोहोचल्यानंतर तिनं आईला घडलेल्या सर्व प्रकाराबाबत सांगितलं. तिनं सांगितलं की, ती खूप घाबरली होती. सुरुवातीला ती आईला याबद्दल सांगायला घाबरत होती. तिला वाटलं की, तिची आई तिला ओरडेल. पण, जेव्हा गौतमीनं आईला हे सर्व सांगितलं त्यावेळी तिची आई संतापली, तिनं मागे वळून त्या माणसाला थोबाडात का नाही मारलीस? तू त्याची त्याची कॉलर पकडायला हवी होती, असं म्हणाली. 

यानंतर, आईनं गौतमीला समजावून सांगितलं, जर असं पुन्हा घडलं तर त्या माणसाचा हात घट्ट धरून मोठ्यानं ओरडायचं. तसंच, कधीच कुणाला घाबरू नको, असा सल्लाही आईनं गौतमीला दिला. गौतमी म्हणाली की, तिच्या आईनं तिला पेपर स्प्रे ठेवण्याचा सल्ला दिला होता आणि जर तिला भीती वाटत असेल, तर तो स्प्रे त्या व्यक्तीच्या  तोंडावर मारायला सांगितला होता. 

दरम्यान, जर गौतमी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, टीव्हीनंतर तिनं ओटीटीवरही आपलं अभिनय कौशल्य दाखवलंय. ती शेवटची 'ग्यारह ग्यारह' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही सीरिज कोरियन ड्रामा 'सिग्नल'चं अडॅप्टेशन आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत कृतिका कामरा, राघव जुयाल, धैर्य करवा आणि आकाश दीक्षित हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सीरिजला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Indian Idol 12 Pawandeep Rajan Health Update: Indian Idol 12 चा विजेता पवनदीप ICU मध्ये, हात-पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget