India Vs Pakistan War Mock Drill: ‘अगर इंडिया पाकिस्तान की, जंग होगी तो माधुरी मेरी होगी...’; पाकच्या मौलानाची अजब मागणी, Video
India Vs Pakistan War Mock Drill: भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी मॉकड्रील केलं जाणार आहे. अशातच पाकिस्तानच्या एका मौलानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India Vs Pakistan War Mock Drill: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तान (Pakistan) आणि भारतातील (India) तणाव पुन्हा वाढला आहे. अशातच आता युद्ध छेडलं जाणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. भारत-पाकिस्तान युद्धाच्या (India Vs Pakistan War) पार्श्वभूमीवर देशव्यापी मॉकड्रील केलं जाणार आहे. अशातच पाकिस्तानच्या एका मौलानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मौलानानं केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
पाकिस्तानातील एका मौलाना एका व्हिडिओमध्ये आपल्या मुलासोबत बसल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये मौलाना म्हणतो की, "जर पाकिस्ताननं भारतासोबतचं युद्ध जिंकलं, तर मी माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) मी घेऊन जाईन." हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. हा राष्ट्रवादाचा विकृत प्रकार असल्याची टीका केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळलीय. अशावेळी पाकिस्तानातल्या मौलवीनं केलेलं हे वक्तव्य अत्यंत संतापजनक असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. तसेच, हे वक्तव्य द्वेष आणि द्वेषयुक्त राष्ट्रवादाला खतपाणी घालणारं असल्याचं बोललं जात आहे.
This maulana wants to take Madhuri Dixit after Pakistan attacks India . This is their level of filth which came to them after years of turning the pages of Aasmani 📖 #IndiaPakistanWar #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/cZ5oaHWuuz
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) May 6, 2025
सोशल मीडियावर संतापाची लाट
मौलानाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. एका युजरनं लिहिलंय की, "ही स्त्रीविरोधी आणि अतिरेकी राष्ट्रवादाची लाजिरवाणे उदाहरण आहे.”, तसेच, काही पाकिस्तानी युजर्सनी लिहिलंय की, "हे वक्तव्य पाकिस्तानमधील अनेकांचे मत दर्शवत नसल्याचं स्पष्ट करणं आवश्यक आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























