एक्स्प्लोर

Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: 'फुंसुक वांगडू, सोनम वांगचुक यांचा संबंधच नाही...'; आमिर खाननं स्पष्टीकरण देऊन गैरसमज दूर केला, उपोषणाबाबत म्हणाला...

Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. 

Aamir Khan On Sonam Wangchuk Hunger Strike: प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) सध्या दिल्लीतील (New Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) उपोषणाला बसलेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) समर्थनार्थ सोनम वांगचुक उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांनी गेल्या 20 दिवसांपासून अन्नाचा एक कणही घेतलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. 

सोनम वांगचुक यांचं उपोषण (Sonam Wangchuk Hunger Strike) 

गेल्या काही दिवसांत, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांचं उपोषण आणि त्यामुळे ढासळलेली प्रकृती याबाबत प्रतिक्रिया दिली. या शास्त्रज्ञानं आपलं उपोषण मागे घ्यावं अशी सर्वांची इच्छा आहे. कारण आंदोलनापेक्षा त्यांची प्रकृती आणि सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे, असं त्यांना वाटतंय. दरम्यान, '3 इडियट्स' (3 Idiots) सिनेमातील भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ओमी वैद्य यांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, त्यांना 'रँचो' (सोनम वांगचुक) यांना मृत्यूच्या दारात पाहायचं नाही.

'3 इडियट्स' सिनेमात आमिर खाननं साकारलेलं 'रँचो' हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याचं बोललं जातं. आता सुपरस्टार आमिर खाननंही या विषयावर भाष्य केलंय. अलिकडेच त्यांनी 'ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट'ला भेट दिलीय, जिथे त्यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी अभिनेत्यानं या शास्त्रज्ञाच्या प्रकृतीबद्दल आपली चिंता व्यक्त केलीय.

"फुंसुक वांगडू आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही..." (Aamir Khan On Sonam Wangchuk)

'3 इडियट्स' (3 Idiots) या आमिर खान स्टारर सिनेमाची कथा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित आहे का? या प्रश्नावर बोलताना आमिर खान म्हणाला की, "नाही, ते खरं नाही... उलट, हा एक गैरसमज आहे. आम्ही जेव्हा हा सिनेमा बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मी नुकताच 'चतुर' (ओमी वैद्य) याचा एक व्हिडीओ पाहिला, ज्यात त्यानं तसं म्हटलंय... पण ते तसं नाही, त्याचा गैरसमज झालाय. चतुरला कदाचित तसं वाटलं असेल, पण मला हे स्पष्ट करायचंय की, राजू (राजकुमार हिरानी), अभिजात जोशी (ज्यांनी '3 इडियट्स'चं लेखन केलंय) किंवा मी, आमच्यापैकी कोणालाही त्या वेळी सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती..."

"सोनम वांगचुक यांच्या कामाचा आदर करण्यासाठी '3 इडियट्स'मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही..."

पुढे बोलताना आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत भाष्य केलंय. आमिर खान म्हणाला की, "तरीही, सोनम वांगचुक जे काम करत आहेत, ते उत्कृष्ट आणि खरोखरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामाचा आदर करण्यासाठी '3 इडियट्स'मधील पात्र त्यांच्यावर आधारित असण्याची गरज नाही. सोनम वांगचुक यांनी स्वतः यापूर्वी स्पष्ट केलंय की, सिनेमातील पात्र त्यांच्यावर आधारित नव्हतं. मला फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करायची होती..."

"आम्हा सर्वांनाच त्यांच्या आरोग्याची आणि आयुष्याची काळजी वाटतेय. हे आंदोलन लवकरात लवकर शांततेनं संपेल आणि सोनम वांगचुक आपलं उपोषण मागे घेऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतील...", असं सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करताना आमिर खान म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Third Marriage Controversy: 'मी त्याला रडताना पाहिलंय...'; तिसऱ्या लग्नावरुन आमिर खान जबरदस्त ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याचं भुवया उंचावणारं वक्तव्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget