Aai Tuljabhavani TV Show: आई तुळजाभवानी करणार कद्दारासूराचा वध; मदतीसाठी भूतलावर अवतरणार साक्षात 'भवानीशंकर' VIDEO
Aai Tuljabhavani TV Show: भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता - तुळजा ते भक्तांवर अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला?
Aai Tuljabhavani TV Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) मालिकेत भक्तांच्या मनाला भिडणारे अनेक प्रसंग बघायला मिळाले. बलाढ्य असुरांचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेनं जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशी 'आई तुळजाभवानी'ची महागाथा सध्या कलर्स मराठीवर सुरू आहे.
भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता - तुळजा ते भक्तांवर अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला? हे प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. सध्या मालिकेच्या कथाभागात कद्दारासूरनं गावात उच्छाद मांडला होता, प्रत्येक भक्ताचं जगणं त्यानं मुश्किल केलं होतं. नुकत्याच समोर आलेल्या भागांमध्ये शिवकन्या अशोकसुंदरीला देखील आपल्या मायाजाळमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यानं केला जो महादेवांनी उधळून लावला आहे.
View this post on Instagram
आता अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून होणार आहे. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव येणार आहेत. महादेव भूलोकावर येण्याचे प्रयोजन नक्की काय आहे? पुढे काय घडणार? हे येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.
तुळजाभवानीच्या भक्तांसाठी कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेचा महत्वपूर्ण भाग आता उलगडणार आहे. दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदू गाठणार आहे. महादेव पृथ्वीवर भवानीशंकर रूपात अवतरणार असून संकटात सापडलेल्या देवीच्या मदतीला देवांचे देव महादेव येत आहेत. प्रत्यक्ष पार्वती मातेच्या तुळजाभवानी अवताराला त्रास देणारे हे आसुरी संकट कोणते? ते दूर करण्यासाठी महादेवांनी रांगडे भवानी शंकर रूप का घेतले? मुलगी अशोकसुंदरीला महादेवांनी पृथ्वीवर राहण्याचे दिलेल्या वचनाचे काय होणार? ते पूर्ण होईल का? या अनेक प्रश्नांची उत्तरे या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
दरम्यान, प्रसंगी योद्धा, पत्नी आणि अनंतकाळ माता रूपात भेटणाऱ्या देवीच्या तामस , राजस आणि सात्विक शक्तींचा प्रत्यय देणारा तुळजाभवानीचा प्रवास सुरू होणार आहे, तो म्हणजे भवानी शंकरासोबत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :