(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aadhya Anand : आध्या आनंद रश्मिकाला देतेय टक्कर; नेटकरी म्हणतायत नक्की 'नॅशनल क्रश' कोण?
Aadhya Anand : आध्याचे सोशल मीडियावरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
Aadhya Anand : सोशल मीडियावर वेगवेगळ्या अभिनेत्रींचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. सध्या दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. पण अभिनेत्री आध्या आनंद (Aadhya Anand) तिला टक्कर देत आहे. आध्याचे सोशल मीडियावरील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता नॅशनल क्रश नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
आध्या ही सध्या तिच्या 'क्रश्ड' (Crushed) या सीरिजमधील अभिनयामुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने आध्या माथुर ही भूमिका साकारली आहे. या सीरिजचे कथानक एका शाळेत जाणाऱ्या मुलीवर आधारित आहे. तसेच या सीरिजमध्ये टीनएज लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे.
आध्या आनंद ही 17 वर्षाची आहे. आध्याचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. तिचा आई-वडील देखील सिंगापूरमध्ये राहतात. आध्यानं बॉम्बे बेगम्स या सीरिजमध्ये अभिनेत्री पूजा भटच्या मुलीची भूमिका साकारली. या सीरिजमधील आध्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या :
बहुचर्चित 'Shark Tank'शोचे परिक्षक कोट्यावधींच्या कंपन्यांचे मालक; पाहा कोण आहेत?
The Kapil Sharma Show : अक्षयनं घेतला कपिलचा आशीर्वाद? कपिलनं सांगितला फोटो मागील किस्सा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha