(Source: ECI/ABP News/ABP Majha)
777 Charlie trailer Out : प्रत्येक श्वान प्रेमीनं आवर्जून बघावा असा चित्रपट; '777 चार्ली' चा ट्रेलर रिलीज
अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) हा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.
777 Charlie trailer Out : दाक्षिणात्य चित्रपट सध्या जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. लवकरच '777 चार्ली' (777 Charlie) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेता रक्षित शेट्टी (Rakshit Shetty) हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दाक्षिणात्य भाषांमध्ये तसेच हिंदी भाषेत देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये एका व्यक्तीचे श्वानासोबत असणारे नाते दाखवण्यात आले आहे.
चित्रपटामध्ये धर्मा या व्यक्तीचे आयुष्य दाखवण्यात येणार आहे. धर्मा हा एका फॅक्टरीमध्ये काम करत असतो. धर्मा हा एकटा राहात असतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात चार्लीची एन्ट्री होते. चार्लीची एन्ट्री झाल्यानंतर धर्माच्या आयुष्या जे काही घडते, ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. चार्ली आणि धर्मामधील नाते या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.
देशभरात रिलीज होणार हा चित्रपट
हा चित्रपट कन्नड, मल्याळम, तमिल, हिंदी आणि तेलगू या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये 10 जून रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
पहा ट्रेलर-
केजीएफ, आरआरआर, पुष्पा या चित्रपटांप्रमाणेच चार्ली चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळेल, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. रक्षित शेट्टीसोबतच राज बी शेट्टी, बॉबी सिम्हा आणि दानिश सैत हे कलाकार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. किरण राज के यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले असून त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केलं आहे. रक्षित शेट्टीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ' आमचा अनेक वर्षांचा प्रवास आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. 10 जून रोजी तुमच्या भोटीस आम्ही येणार आहोत. तुमचे प्रेम आम्हाला मिळेल, अशी आशा व्यक्त करतो. ' रक्षितनं चार्लीसोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमधील चर्ली आणि रक्षितच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोला लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा :
- Kangana Ranaut : 'स्टार किड्स उकडलेल्या अंड्यासारखे दिसतात'; कंगनाचं वक्तव्य चर्चेत
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स!