उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद होत नाही, कारण यमराज इथं बसला आहे; अमरावतीच्या सभेतून योगी आदित्यनाथ यांची चौफेर फटकेबाजी
Yogi Adityanath in Amravati: आमच्या उत्तरप्रदेश मध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहाद होत नाही, कारण यमराज इथं बसला आहे. असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
अमरावती : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रचारफेऱ्या आणि प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. दिल्लीतील दिग्गज नेतेही महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत, या सभांमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. त्यातच, भाजपकडून बटेंगे तो कटेंग आणि एक है तो सेफ है... असा नारा देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात या घोषणांची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी (Yogi Adityanath) महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना बटेंगे तो कटेंगाचा नारा दिला होता. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है, असा नारा दिला असताना योगी आदित्यनाथ यांनी आज पुन्हा एकदा परतवाडा येथील सभेतून तोच नारा देत विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
अचलपूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा आयोजीत केली आहे. यावेळी खासदार अनिल बोंडे, नवनीत राणांसह महायुतीचे इतर नेते देखील उपस्थित आहे. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि, लव्ह जिहाद, लँड जिहादसाठी मविआ गठबंधन झाले आहे. तीन दिवसांपासून मल्लिकार्जुन खरगे माझ्यावर नाराज झाले आहेत, की मी अशी भाषा करतो. मात्र खरगेजी मी योगी आहे. माझ्यासाठी देश पहिले आहे. खरगे यांचं गाव हैदराबाद मधील एक गावात आहे. मुस्लिम लीगला प्रोत्साहित करण्याचं काम काँग्रेस करतेय. या संघटनेने हिंदूंना कापण्याचं काम केलं आहे. लोकसभेच्या वेळी झाली ती चूक पुन्हा होऊ देऊ नका. गणपती वर दगडफेक होईल, लव्ह जिहाद होईल आणि आता आरपार होईल. आमच्या उत्तरप्रदेश मध्ये लव्ह जिहाद आणि लँड जिहाद होत नाही, कारण यमराज इथं बसला आहे. असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
अमरावतीची जनता स्वप्नातही अशी चूक करणार नाही
एक राष्ट्रची संकल्पना पेशवा बाजीराव यांनी करून दाखवली. पूर्ण देशात सगळं समान व्हावं म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर योगदान दिलं. हिंदू संघटन कसं व्हावं हे संघाने केले आहे. हरियाणामध्ये काँग्रेस सांगत होती आमचे सरकार येईल, पण तिथं भाजपने सरकार बनवलं. आता महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक होत आहे. जनत लोकसभेत जी कमी राहिली ती यावेळी पूर्ण करतील. आता अमरावतीची जनता स्वप्नात ही अशी चूक करणार नाही. कारण तुमच्या इकडे तांडव होतो. तो याच्या साठी झाला कारण तुम्ही वाटल्या गेले होते. बटे तो कंटेंगे, म्हणून मी आवाहन करायला आलो की एक रहो सेफ रहो.
ये नया भरात है, नया भारत छेडना नही, नही तो ये छोडता भी नही
आजही कश्मीरमध्ये झेंडा फडकत आहे. हे सर्व काम इंदिरा गांधी, राजीव गांधी कोणीच नाही केलं, केलं तर ते फक्त मोदी यांनी केलं. 2014 पूर्वी पाकिस्तान सीमेच्या आत येत होता, चीन पण घुसत होता. कोणी बोलायला तयार नव्हते. आम्हाला सांगत होते तुम्ही बोलू नका, संबंध खराब होतील. म्हणजे यांना संबंध बनवायचं होते. मात्र, हा नया भारत आहे, छेडना नही, नही तो छोडता भी नही, असा सज्जड दमही योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. आज सुरक्षा पण आहे आणि सन्मान पण आहे. मी जेव्हा अयोध्या बद्दल बोलतो तेव्हा पुन्हा मी त्याच मुद्द्याच बोलतो. 500 वर्ष भगवान राम मंदिर का झालं नाही. मी मुख्यमंत्री झालो तेव्हा 500 वर्षाचे स्वप्न पूर्ण झालं. अयोध्यामध्ये राम मंदिर सुरू आहे, काशी मध्ये पण विकासकाम सुरू आहे. 50 हजार भाविक एकेवेळी दर्शन करू शकतात. हा नवा भारत आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा