एक्स्प्लोर

NCP Ajit Pawar: महाराष्ट्रात जिंकलं, आता आता मिशन दिल्ली; प्रफुल्ल पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची पुढची रणनीती

NCP Ajit Pawar: अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त प्रादेशिक पक्ष राहिला आहे. त्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, दोन गट निर्माण झाले, निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचं सांगितलं यानंतर हे प्रकरण आता न्याप्रविष्ट आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही मोठं यश मिळालं, त्याआधी नागालँड राज्यात देखील मोठं यश मिळवलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर आता दिल्लीत देखील निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हटलं की, 'महाराष्ट्राच्या आधी नागालँड मध्ये देखील आम्ही यश मिळवलं होतं. आमचा उपाध्याक्ष तिथं आहे. अरुणाचल प्रदेश मध्ये देखील 3 आमदार निवडून आले आहेत. आम्हाला 3 राज्यात यश मिळालं आहे. अजून पुढे देखील यश प्राप्त करायचं आहे. आम्हाला आता दिल्लीत देखील निवडणूक लढायची आहे. आम्ही नक्कीच इथं आमच खातं खोलू त्याचबरोबर लवकरच आपण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळवणार आहोत, आपण सतत पुढे जाणार आहोत आणि यश प्राप्त करणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. 

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या आधारावर मिळतो?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याकरता राजकीय पक्षांकडे किमान तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 2 टक्के जागा असायला हव्या, म्हणजेच लोकसभेच्या 11 जागा असाव्यात. त्याचबरोबर जर एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. प्रादेशिक पक्ष, राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते किंवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. जर सहा टक्क्यांहून कमी मते असतील तर किमान तीन सदस्य विधानसभा निवडणुकीत विजयी होणे आवश्यक असते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त प्रादेशिक पक्ष राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांना देखील आपला राष्ट्रीय पक्षांचा दर्जा गमवावा लागला. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळणाऱ्या सवलती आता गमवाव्या लागल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा नव्या जोशात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अजित पवार काय म्हणाले? 

प्रत्येक राज्यात आपण आपले आमदार निवडून आणत आहोत. महिलांना देखील आपण कशी संधी देऊ शकतो याचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे. लोकसभेला यश मिळालं नाही. मात्र, कार्यकर्ता हरला नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आपले उमेदवार 1 लाख, 80 हजार मर्जिनने जिंकलो.आता विरोधक म्हणत आहेत, की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. असं कसं काय? लोकसभेला जागा निवडून आल्या त्यावेळी अडचण नव्हती. आता मात्र, ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. विधानसभेला आलेल्या अपयशामुळे अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत.आपल्याला आता आपला पक्ष पुढे घेऊन जायच आहे. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर नंतर घेणार आहोत. त्या आधी जे बदल करायचे आहेत ते नक्की करूयात. आपण तरुणाना संधी देणार आहोत महिलाना संधी देणार आहोत. आज मुख्यमंत्री ठरवण्यासाठी मीटिंग आहे. भाजपचा जागा जास्त असल्यामुळे भाजपचे श्रेष्ठ नेते नरेंद्र मोदी,अमित शाह त्याबाबत निर्णय घेतील, असं अजित पवार दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GST Slab Change : सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?
सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?
GST Slab Change 2025 : पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती जीएसटी लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती GST लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange PC Mumbai Azad Maidan : आरक्षण लढाई जिंकलो, मनोज जरांगे यांची विजयी पत्रकार परिषद
Manoj Jarange Full Speech : देवेंद्र फडणवीस...महागात पडेल! आझाद मैदानावरील स्फोटक भाषण Azad Maidan
Maratha Reservation: सरकारचा मसुदा ABP Majha च्या हाती, Kunbi प्रमाणपत्र, Hyderabad Gazetteer वर मुद्दे.
Maratha Protest Mumbai दुपारपर्यंत रिकामी करा, मुंबईत मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश
Maratha Protest मध्य प्रदेशातील तरुण-मराठा आंदोलक;आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न,आंदोलकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GST Slab Change : सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?
सरकारचा दिवाळी धमाका! GST स्लॅबमध्ये मोठा बदल; दूध-पनीर, टीव्ही, सिमेंट आणि रोजच्या कोणत्या वस्तू स्वस्त?
GST Slab Change 2025 : पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती जीएसटी लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
पनीर-दूध, सिमेंट, औषध आणि नव्या कारवर किती GST लागणार? आठ मोठे प्रश्न आणि त्यावरचे A to Z उत्तर
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मराठा आरक्षणाच्या जीआरबाबात संभ्रम, आम्ही कोर्टात जाऊ; सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्री छगन भुजबळांची भूमिका
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये भीषण आग; 10 ते 12 दुचाकी जळाल्या, फायर ब्रिगेड मदतीला
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
लव्ह मॅरेजचा भयाकन द एन्ड; पतीनेच मुस्कानचं शिर धडावेगळं केलं; पोलिस तपासात गूढ उलगडलं
Donald Trump : अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
अमेरिकेविरोधात कट रचला जातोय, किम-पुतीन यांच्या भेटीनंतर ट्रम्प भडकले; रशियाचेही उत्तर...
OBC : ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
ओबीसींसाठीही उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य
पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस
पालघर इमारत दुर्घटनेवर मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस
Embed widget