एक्स्प्लोर
सर्व चोरांचे नाव मोदीच का? राहुल गांधींचा सवाल तर भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव
कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. "सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते?" असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
नांदेड : कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. "सर्व चोरांचे नाव हे मोदीच कसे काय असू शकते?" असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून देश सोडून पळून गेलेला भामटा नीरव मोदी आणि आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदी यांची नावं घेऊन राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी भाषण दिले.
राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाचे दार ठेठावले आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. भाजप नेत्यांनी याप्रकरणी राहुल गांधी लोकांचा जातीवरुन अपमान करत असल्याची तक्रार केली आहे.
राहुल यांनी पुन्हा एकदा राफेलवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मॅन्यूफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कोणताही अनुभव नसताना अनिल अंबानीला ऑफसेटचा ठेका (कंत्राट)कसा मिळाला? असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला आहे. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदींनी ऑफसेटचे कंत्राट अनिल अंबानीला देऊन नागरिकांचे 30 हजार कोटी रुपये अंबानीच्या खिशात टाकले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement