एक्स्प्लोर
Advertisement
एकच वादा...अजित दादांना शोधा! पवार साहेबांचा आदेश आणि धनंजय मुंडेंचं सर्च ऑपरेशन!
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 'आऊट ऑफ रिच' होते. कालपासून अजित पवारांचा ठावठिकाणा खुद्द शरद पवारांनाही माहित नव्हता. सारा मीडिया त्यांना फोन करून थकला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सकाळी शरद पवार यांच्या 'ईडी' भेटीमुळे तयार झालेल्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं होतं. कार्यकर्तेही सैरभैर झाले होते. यानंतर सुरू झालं अजित पवारांसाठी सर्च ऑपरेशन....धनंजय मुंडेंद्वारे!
औरंगाबाद: अजित पवार 'आऊट ऑफ रिच' झाल्यानंतर त्यांना शोधण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेते धनंजय मुंडेंवर सोपवली. मात्र, मुंडे यांनाही अजित पवारांचा ठावठिकाणा लागत नव्हता. कारण, आपल्याशी संपर्क साधला जाणार हे माहित असलेल्या अजित पवारांनी सर्व फोन बंद ठेवले होते. शिवाय, ते कुठल्याही स्वाभाविकरित्या अंदाज केला जाईल अशा ठिकाणी गेले नव्हते. त्यांच्या सचिवांचे फोनही 'स्विच ऑफ लागत होते'. पवारांचे अगदी निवडक लोकांना माहित असलेले फोन क्रमांकही लागत नव्हते. या सगळ्या परिस्थितीमुळे धनंजय मुंडेची अडचणही वाढत गेली.
अखेर धनंजय मुंडे यांच्या पक्षीय भूमिकेपलिकडील संपर्कामुळे त्यांना अजित पवारांचा ठावठिकाणा कळला. अजित पवार हे मुंबईतील त्यांचे सख्खे थोरले बंधु श्रीनिवास पवार यांच्या घरी होते. मुंडेंनी यानंतर शरद पवारांचा निरोप अजित पवारांपर्यंत पोहोचवला. मुंडेंनी अजित पवार व शरद पवारांचं बोलणंही करून दिलं. आज सकाळी १० ते दुपारी १पर्यंत अजित पवार आणि धनंजय मुंडे सोबत होते. १ वाजता अजित पवारांना शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी मुंडे घेऊन आले. यानंतर पवार कुटुंबिय आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दुपारी ३.३०वा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेची माहिती दिली.
मात्र, या एकूणच प्रकरणानं अजित पवारांनी पक्षातल्या नेत्यांना 'कामाला लावलं' हे नक्की!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement