एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

WB Election 2021 Phase 4 Voting : बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु, दिग्गजांचं भवितव्य पणाला

पश्चिम बंगालमध्ये आज होणाऱ्या या मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होईल. एकूण 44 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक हायप्रोफाईल लढतींचाही समावेश आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या चौथ्या टप्पाचं मतदान आज पार पडणार आहे. 10 एप्रिलला होणाऱ्या या मतदानात 382 उमेदवारांचं भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये सीलबंद होणार आहे. आज एकूण 44 जागांसाठी मतदान होईल. त्याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर केंद्रीय पथक आणि पश्चिम बंगाल पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रचाराच्या दरम्यान सातत्याने ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय पोलीसांवर टीका केली होती. 

चौथ्या टप्प्यातल्या मतदानाच्या प्रचारतोफा गुरुवारी (8 एप्रिल) थंडावल्या. आज होणाऱ्या मतदानामध्ये उत्तर बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यातल्या 5 जागांसाठी, कूचबिहार जिल्ह्यातल्या 9 जागांसाठी तर दक्षिण बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या 10 जागा, हावडा जिल्ह्यातल्या 9 जागा आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. चौथ्या टप्प्यातल्या मतदारांना खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. आता मतदार आज कोणाला मतं देतात ते 2 तारखेला स्पष्ट होईल. 

44 जागांमध्ये हायप्रोफाईल लढती
आज होणाऱ्या 44 जागांमध्ये अनेक हायप्रोफाईल लढती होणार आहेत. यामध्ये सिंगूर विधानसभा लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इथे ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या सिंगूरमधून ममतांचे सहकारी बेचाराम मन्ना लढत आहेत. हावडा जिल्ह्यातल्याच शिबपूर विधानसभा मतदारसंघात माजी क्रिकेटर मनोज तिवारी आपलं नशीब आजमवत आहे. हावडा मध्य मतदारसंघातून मंत्री अरुप राय निवडणूक लढवत आहेत. कूचबिहार जिल्ह्यातल्या  दिनहाटा मतदारसंघातून उदयन गुहा, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या टॉलिगंज मतदारसंघातून मंत्री अरुप विश्वास, बेहला पश्चिम मतदारसंघातून मंत्री पार्थ चॅटर्जी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

भाजपकडून टॉलिगंज मतदारसंघातून केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, चुचुडा मतदारसंघातून खासदार लॉकेट चॅटर्जी, चंडीतला मतदारसंघातून अभिनेता यश दासगुप्ता, जादवपूर मतदारसंघातून रिंकू नस्कर तर डोमजूर मतदार संघात माजी मंत्री आणि टीएमसीचे नेते राजीव बॅनर्जी यांचं भवितव्य कैद होणार आहे. 

केंद्रीय पथकाची मतदारसंघात गस्त
तीन टप्प्यांचा अनुभव बघता आजही बंगालमध्ये काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या तुकड्या गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघात गस्त घालत आहेत. बंगालमध्ये दहशतीचं वातावरण असलं तरी मतदानाची टक्केवारी चांगली असल्याने ही समाधानाची बाब आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget