एक्स्प्लोर
Advertisement
उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल : मुख्यमंत्री
काही दिवसांपूर्वीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती.
मुंबई : उदयनराजे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल. भाजपात येण्याचा सर्वस्वी निर्णय त्यांचाच असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. काही दिवसांपूर्वीत राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयन राजे यांनी मुख्यमंत्र्यांची 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. भाजपची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये पोहोचली आहे. तिथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंसह विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केलं.
भाजपमध्ये येण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचाच
खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांविषयी विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, "उदयनराजे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रासह साताऱ्यातील अनेक विकासकामं झाली नाहीत. उदयनराजे आमच्याकडे आले, राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला, सिंचनाचे प्रकल्प मंजूर केले. त्यांनी आधीही म्हटलं होतं की जे आमच्या सरकारच्या काळात झालं नाही, ते युती सरकारच्या काळात होतंय. आताभाजपमध्ये येण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल. ते पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल."
उदयनराजे काय म्हणाले?
"मी लोकांचं हित पाहून निर्णय घेईन. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. साताऱ्यातील विकासकामांबाबत आमची चर्चा झाली. पूर्वी माझी कामं होत नव्हती. परंतु फडणवीस यांनी माझी खूप कामं केली. तसंच प्रत्येक पक्षात माझे जवळचे संबंध असलेले नेते आहेत. त्याचा अर्थ असा नाही की, मी त्यांच्या पक्षात जाईन. मी माझ्या मनाला वाटेल तेव्हा आणि मनाला पटतील ते निर्णय मी घेत असतो. यापुढेही मी जनतेच्या हिताचा विचार करुन निर्णय घेईन," अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांबाबत दिली होती.
पाहा काय म्हणाले उदयनराजे?
उदयनराजे आणि मुख्यमंत्र्यांची भेट
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामकाम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच खासदार उदयनराजे यांनी 21 ऑगस्ट रोजी रात्री मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली. परंतु ही भेट साताऱ्यातील विकासकामांबाबत झाल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement