एक्स्प्लोर

उमेदवारी नाकारण्याचं कारण पक्षानं सांगितलं नाही : विनोद तावडे

सगळ्यांनी अस्वस्थ न होता काम करू आणि दोन तृतीअंश बहुमताने निवडणूक आणू, असेही तावडे म्हणाले. भाजपची चौथी यादी आज घोषित करण्यात आली. यामध्ये तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित यांच्यासह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापला गेला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बोरिवली विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांची उमेदवारी कापत सुनील राणे यांना संधी देण्यात आली आहे. तावडे यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तावडे म्हणाले की, आपण मंत्री नाहीत म्हणजे काम थांबणार नाही. आम्हाला नेशन फस्ट असं सांगितलं आहे. त्यामुळं इथून पुढं जी जबाबदारी दिली जाईल ती मनापासून पूर्ण केली जाईल, असे तावडे म्हणाले. तावडे म्हणाले की, बोरिवलीसह राज्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. स्पष्ट बहुमताने आम्ही सत्तेत येऊ. सध्या मला उमेदवारी का दिली नाही याच्या विश्लेषणाची वेळ नाही, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर नक्की चर्चा होईल. आता निवडणुकांची वेळ आहे. मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे. जे काम दिलं जाईल ते चांगल्या पद्धतीने करेन, असेही ते म्हणाले. आमचे काम राष्ट्र निर्माणाचं आहे. बरेच जण आमदार नाहीत तरी काम करतात. विद्यार्थी परिषद आणि संघाने आम्हाला राष्ट्रहिताचे काम करायचं शिकवलं आहे. मला उमेदवारी न देण्याचे कारण नक्की असेल मात्र अजून  बोलता आलेलं नाही, मात्र पक्षनेतृत्वाची चर्चा केली जाईल. काही चुकलं असेल तर पक्ष सांगेल आणि नंतर संधी देईल, असेही तावडे म्हणाले. भाजपमध्ये काम करताना पक्षाला अभिप्रेत असलेलं काम करेल. माझ्याकडून काही चुका झाल्यात असं वाटत नाही. असतील तर बोललं गेलं असतं. पक्षाचं काय धोरण किंवा राजकारण आहे हे निवडणुका झाल्यानंतर कळेल, असेही ते म्हणाले. आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत. मला राज्यभरातून फोन येत आहेत. सगळ्यांनी अस्वस्थ न होता काम करू आणि दोन तृतीअंश बहुमताने निवडणूक आणू, असेही तावडे म्हणाले. भाजपची चौथी यादी आज घोषित करण्यात आली. यामध्ये तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित यांच्यासह तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापला गेला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar Baramati Election: सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका
सुनेत्रा काकींनी बोलावल्यास जाईन, बारामती पोटनिवडणूक उमेदवारी अर्जावर युगेंद्र पवारांची भूमिका
Gokul Milk Kolhapur : 'गोकुळ' मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाविरोधात चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?
'गोकुळ' मतदार नोंदणी वादाच्या भोवऱ्यात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाविरोधात चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   

व्हिडीओ

Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली
Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
Iran War Live Update: इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
Embed widget