एक्स्प्लोर

राणेंनी10 टक्के कमिशन घेतलं, दिल्लीतील उद्योगपतीच्या तक्रारीनंतर मोदींनी राणेंना मंत्रिपद नाकारलं; विनायक राऊतांचा आरोप

Vinayak Raut On Narayan Rane : शिवसेना संपणार असं म्हणणाऱ्या नारायण राणेंना मुलाच्या प्रचारासाठी दारोदारी धनुष्यबाण घेऊन फिरावं लागतंय असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. 

सिंधुदुर्ग : दिल्लीतील एका प्रतिष्ठित उद्योगपतीने पंतप्रधान कार्यायला मेल करून राणेंनी मंत्रिपद मिळालेल्या खात्याचा बट्ट्याबोळ केला, त्यांच्या पीएने 10 टक्के कमिशन घेतल्याची तक्रार केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्राची दखल घेत राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही असा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. नारायण राणेंनी हे खोटं असल्यास त्याचं उत्तर द्यावं असं आव्हान राऊत यांनी दिलं. लोकसभेला जसा भाजपचा सुपडा साफ झाला, तसंच विधानसभेला होणार असून महाविकास आघाडीच्या 180 जागा निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विनायक राऊत हे कुडाळमध्ये बोलत होते. 

नारायण राणेंवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की, "इटूकली, बिटूकली, पुटूकली राणेंची काय औकात? राणे तुमची औकात काय? उद्धव ठाकरेंना धमकी देणं सोडून द्या. आज बाळासाहेब असते तर गोळ्या घातल्या असं म्हणणाऱ्या नारोबाची बाळासाहेबांनी हकालपट्टी केली. राणेनी शिवसेना संपवणार असं म्हटलं होत. त्याच राणेंना 2024 साली मुलाच्या प्रचारासाठी धनुष्यबाण घेऊन दारोदार फिरावं लागतं. राणेंचा पराभव करण्याचा इतिहास या कुडाळ मालवणमध्ये घडला. त्याच राणेंच्या मुलाचा, निलेश राणे यांचा पराभव करायची संधी पुन्हा एकदा वैभव नाईक यांना मिळाली आहे."

चिपी विमानतळ का बंद पडले ते राणेंनी सांगावं

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेचा पैसा लुबाडण्याचं काम सुरू आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केला. चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र चिपी विमानतळ बंद का याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं. राणेंना चिपी विमानतळ बंद झालं याचा थांग पत्ता लागला नाही. ते विमानतळ पुन्हा मी सुरू करणार. राणेंना त्या विमानतळावरून यायचं नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना इथून यायचं आहे असं विनायक राऊत म्हणाले. 

दीड हजार देऊन आमच्या भगिनीची चेष्ठा करता. आमची सत्ता आल्यास आम्ही पंचसूत्री मधून भगिनींना 3000 रुपये देणार. 65 वर्षांवरील नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये देणार असं राऊत म्हणाले.  महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांना मोफत बस सेवा, 25 हजार महिलांची पोलीस भरती करणार असं आश्वासन राऊत यांनी दिलं. महायुतीच्या सरकारने सांगावं कोकणातील शेतकऱ्यांना बोनस दिला का? असा प्रश्न त्यांनी केला. 

मालवणमध्ये 13 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची सभा आहे. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यामुळेच आम्ही मालवणला सभा घेतोय असं विनायक राऊत म्हणाले.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahu Maharaj on Raju Latkar: सूनेची उमेदवारी मागे का घेतली? राड्यावर शाहू महाराज काय म्हणाले?Sharad pawar On Balasaheb Thorat : धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करु नका : शरद पवारPrithviraj Patil On  Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गारABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
Embed widget