एक्स्प्लोर
Advertisement
राष्ट्रवादीला मोठा धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवरील गरवारे हॉलमध्ये उद्या दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये केली.
सोलापूर : राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा रणजितसिंह यांनी अकलूजमध्ये केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करायचा का ? असा प्रश्न रणजितसिंह यांनी विचारताच हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने घोषणा देत भाजप प्रवेश करण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शवलं.
अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. कृष्णाभीमा स्थिरीकरण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, असं रणजितसिंह म्हणाले.
याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचंही मोहिते-पाटलांकडून कौतुक करण्यात आलं. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.
अकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जवळपास पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. उपस्थित कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला. तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार यादीत मोहिते-पाटलांचं नाव नव्हतं. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे, रणजितसिंह पाटलांनी फेसबुक पोस्ट लिहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. ऑपरेशन विखे-पाटीलनंतर भाजपने ऑपरेशन मोहिते पाटीलही फत्ते केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाही मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत.
संबंधित बातम्या
सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement