महायुतीतील मित्रपक्ष रुसला; आमच्यावर वारंवार अन्याय केला तर भाजपला परिणाम भोगावे लागतील, थेट इशारा
भाजप आमच्यावर वारंवार अन्याय करत असेल तर आमच्याकडेही पर्याय आहे आणि याचं भाजपला भोगावे लागेल, असा इशारा आरपीआयचे युवक अध्यक्ष पप्पू कागदी यांनी दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhan Sabha Election) बिगुल वाजताच राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग आलाय. निवडणुकीच्या लढाईसाठी वेळ कमी असतानाच नाराजी सत्र मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजूनही जागा वाटपावरून पक्षांची नाराजी समोर येत आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या एका पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं दिसत आहे. भाजप आमच्यावर वारंवार अन्याय करत असेल तर आमच्याकडेही पर्याय आहे आणि याचं भाजपला भोगावे लागेल, असा इशारा दिला आहे.
महायुतीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष सहभागी असल्याने इच्छुकांना त्यांच्या इच्छेनुसार पक्षांतून अधिकृत उमेदवारी देतानाही पक्षांना अडचणी येतात. नाराज झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदवारांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. महायुतीच्या जागावाटपात साधं चर्चेलाही बोलवलं नसल्याने आरपीआय आठवले गटात मोठी नाराजी आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी आरपीआयचे सर्व युवक जिल्हाध्यक्ष एकवटले आहेत. भाजप आमच्यावर वारंवार अन्याय करत असेल तर आमच्याकडेही पर्याय आहे आणि याचं भाजपला भोगावे लागेल, असा इशारा आरपीआयचे युवक अध्यक्ष पप्पू कागदी यांनी भाजपला दिला आहे.
आरपीआयमध्ये मोठी खदखद
राजकारणात भाजपला अस्पृश्य मानलं जात होतं त्यावेळी आम्ही भाजपच्या सोबत गेलो मात्र भाजप आता आम्हाला विसरली आहे. आमचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपशी त्वरित संपर्क साधावा नाहीतर पक्षामध्ये मोठी खदखद असून अनेक जण वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे युवकांना रामदास आठवले यांना ही युवकांनी इशारा दिला आहे. महायुतीतून महादेव जानकर बाहेर पडल्यानंतर आता आरपीआयमध्ये ही मोठी खदखद आहे.
आम्हाला दुर्लक्षित करु नका: रामदास आठवले
छोट्या पक्षांना गृहित धरण्याचा किती मोठा फटका बसतो हे या निवडणुकीतून दिसून आलं आहे. बच्चू कडू यांनी दणका दिल्यानंतर आता महायुतीतील आणखी एका मित्रपक्षाने मोठी मागणी केली आहे. जागावाटपावर बोलताना रामदास आठवले म्हणले होते की, महायुतीत जागा आम्हाला कोणत्या देणार याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. लवकरच ते वेळ देणार आहेत, अपेक्षा आहे 7 ते 8 जागा मिळतील. आम्हाला दुर्लक्षित करु नका, महामंडळ एक पण दिले नाही. आता सत्तेत आल्यावर मंत्री पद, महामंडळ, विधानपरिषद तरी द्या अशी आमची मागणी असेल. आमच्या मागण्यांचे पत्र आम्ही युतीतील नेत्यांना देणार आहे. काही जागा मिळाल्या नाही तरी आम्ही युतीत राहू...
हे ही वाचा :
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण