एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election 2024: मोठी बातमी : उद्धव ठाकरे उमेदवार यादीत बदल करणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर निर्णय, कोणकोणते उमेदवार बदलणार?

Uddhav Thackeray Group : ठाकरेंनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये जाहीर केल्या गेलेल्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार आहे. 

Vidhan Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या यादीमध्ये काही मोजक्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.  महाविकास आघाडीमध्ये  काही मोजक्या जागांवर तिढा कायम असताना त्या तिढा असलेल्या जागांवरसुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या उमेदवार यादीमध्ये जाहीर केल्या गेलेल्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार आहे. 

ठाकरे गटाकडून जाहीर केलेल्या 65 जागांमध्ये काही बदल होणार 

महाविकास आघाडीमध्ये  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं 65 जागा जाहीर केल्या आहेत. त्यातील मोजक्या तीन ते चार जागांवर काही ठिकाणी काँग्रेसचे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा, अशी मागणी महाविकास आघाडीत ठाकरेंसोबत असलेल्या मित्रपक्षांनी केली आहे. त्यामुळे ठाकरे जाहीर केलेल्या यादीतील काही नावांमध्ये बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

शिवसेना उद्धव ठाकरे गटानं महाराष्ट्र विधानसभेसाठी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरळी मतदारसंघातून अदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, कोपरी पाचपाखाडीमधून केदार दिघेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.

ठाकरेंनी पहिल्या यादीतून कोणत्या नावांची घोषणा केली...? 

  • चाळीसगाव : उन्मेश पाटील
  • पाचोरा : वैशाली सुर्यवंशी
  • मेहकर (अजा) : सिद्धार्थ खरात
  • बाळापूर : नितीन देशमुख
  • अकोला पूर्व : गोपाल दातकर
  • वाशिम (अजा) : डॉ. सिद्धार्थ देवळे
  • बडनेरा : सुनील खराटे
  • रामटेक : विशाल बरबटे
  • वणी : संजय देरकर
  • लोहा : एकनाथ पवार
  • कळमनुसी : डॉ. संतोष टारफे
  • परभणी : डॉ. राहुल पाटील
  • गंगाखेड : विशाल कदम
  • सिल्लोड : सुरेश बनकर
  • कन्नड : उदयसिंह राजपुत
  • संभाजीनगर मध्य : किशनचंद तनवाणी
  • संभाजीनगर प. (अजा) : राजु शिंदे
  • वैजापूर : दिनेश परदेशी
  • नांदगांव : गणेश धात्रक
  • मालेगांव बाह्य : अद्वय हिरे
  • निफाड : अनिल कदम
  • नाशिक मध्य : वसंत गीते
  • नाशिक पश्चिम : सुधाकर बडगुजर
  • पालघर (अज) : जयेंद्र दुबळा
  • बोईसर (अज) : डॉ. विश्वास वळवी
  • भिवंडी ग्रामीण (अज) : महादेव घाटळ
  • अंबरनाथ – (अजा) : राजेश वानखेडे
  • डोंबिवली : दिपेश म्हात्रे
  • कल्याण ग्रामीण : सुभाष भोईर
  • ओवळा-माजिवडा : नरेश मणेरा
  • कोपरी पाचपाखाडी : केदार दिघे
  • ठाणे : राजन विचारे
  • ऐरोली : एम.के. मढवी
  • मागाठाणे : उदेश पाटेकर
  • विक्रोळी : सुनील राऊत
  • भांडूप पश्चिम : रमेश कोरगावकर
  • जोगेश्वरी पूर्व : अनंत (बाळा) नर
  • दिंडोशी : सुनील प्रभू
  • गोरेगांव : समीर देसाई
  • अंधेरी पूर्व : ऋतुजा लटके
  • चेंबूर : प्रकाश फातर्पेकर
  • कुर्ला (अजा) : प्रविणा मोरजकर
  • कलीना : संजय पोतनीस
  • वांद्रे पूर्व : वरुण सरदेसाई
  • माहिम : महेश सावंत
  • वरळी : आदित्य ठाकरे
  • कर्जत : नितीन सावंत
  • उरण : मनोहर भोईर
  • महाड : स्नेहल जगताप
  • नेवासा : शंकरराव गडाख
  • गेवराई : बदामराव पंडीत
  • धाराशिव : कैलास पाटील
  • परांडा : राहुल ज्ञानेश्वर पाटील
  • बार्शी : दिलीप सोपल
  • सोलापूर दक्षिण : अमर रतिकांत पाटील
  • सांगोले : दीपक आबा साळुंखे
  • पाटण : हर्षद कदम
  • दापोली : संजय कदम
  • गुहागर : भास्कर जाधव
  • रत्नागिरी : सुरेंद्रनाथ (बाळ) माने
  • राजापूर : राजन साळवी
  • कुडाळ : वैभव नाईक
  • सावंतवाडी : राजन तेली
  • राधानगरी : के.पी. पाटील
  • शाहुवाडी : सत्यजीत आबा पाटील
एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget