एक्स्प्लोर

Vanchit Bahujan Aghadi : EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन, स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात

Vanchit Bahujan Aghadi on EVM : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

Vanchit Bahujan Aghadi on EVM अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVMच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ही वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

EVM वरुन ठाकरे गट आक्रमक, आकडेवारी देत थेट प्रेझेंटेशन मांडलं!

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल, बॅलेट मतदान हे ट्रेंडचं रिप्रेझेंटेशन असतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मविआचा 31 जागांवर लीड होतं तर 16 जागांवर महायुतीला लिड होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर आहे. तर महायुती 140 जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत 143 वरून 46 जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 06 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सBengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागणसकाळी १० च्या100 हेडलाईन्स- Top Headlines at 10AM 06 January 2025  Top 100 at 10AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
चीनमधील HMPV व्हायरसच्या बातमीनं काळजात धडकी भरली, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर; लक्षणं कशी ओळखावी?
Beed News: मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
मनोज जरांगेंना तडीपार करा! धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा गुणरत्न सदावर्तेंना व्हिडीओ कॉल
Team India : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! जसप्रीत बुमराह अन् मोहम्मद शमी स्पर्धेतून होणार बाहेर?
Embed widget