एक्स्प्लोर

उदगीर विधानसभा मतदारसंघ | भाजपमधील गटबाजीमुळे सुधाकर भालेरावांना नुकसान होणार?

मुस्लीम, दलित मतदारांचे इथे वर्चस्व असल्याने वंचित बहुजन आघाडीलाही मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, स्वतःच्या ताकदीवर विजय नोंदवू शकेल असा उमेदवार इथे नाही. तरीही इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे.

उदगीर या मुस्लीम बहुल मतदारसंघावर आर्य समाज, हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्याचबरोबर इथला विजय हा जातीय समीकरणावर आधारित असतो. याचा कायमच प्रत्यय येत राहतो. या मतदारसंघात उमेदवार कोण यापेक्षा जातीय समीकरणे प्रबळ आहेत.
उदगीर हा राखीव मतदारसंघ आहे. जेव्हापासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे, तेव्हापासून भाजपाने ही जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली आहे. भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मागील दोन्ही वेळी इथून विजय प्राप्त केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या सीमावर्ती भागातील उदगीर मतदारसंघात उदगीर आणि जळकोट तालुक्यांचा समावेश आहे. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेली ही जागा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ताब्यात होती. या मतदारसंघात संघाचे नेटवर्क उत्तम आहे. ज्याचा फायदा भाजपाला मिळत आला आहे.
मागील दोन टर्म भाजपाचे सुधाकर भालेराव इथून निवडून येत आहेत. 2014 मध्ये भाजप अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी असली तरी मोदी लाटेचा प्रभाव, राष्ट्रवादीची फाटाफूट, काँग्रेसमधील विस्कळीतपणाचा लाभ भालेराव यांना मिळाला. मात्र, यावेळी तो फायदा मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. भाजपातील अनेक गट-तट आहेत, जे आमदाराच्या विरोधात सक्रिय झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत त्याचे खुले प्रदर्शनही झाले. राष्ट्रवादीच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. मात्र राज्यात राष्ट्रवादीची झालेल्या वाताहतीचा काहीसा परिणाम या मतदारसंघावरही होत आहे. खंबीर नेतृत्वाअभावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात लढण्याची उमेदच राहिली नाही. गतवेळी अपयशी लढत दिलेल्या संजय बनसोडे यांनी पराभवानंतरही सातत्याने उदगीर-जळकोटशी संपर्क कायम ठेवल्याचा लाभ राष्ट्रवादीला संभवतो.
मुस्लीम, दलित मतदारांचे इथे वर्चस्व असल्याने वंचित बहुजन आघाडीलाही मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, स्वतःच्या ताकदीवर विजय नोंदवू शकेल असा उमेदवार इथे नाही. तरीही इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळत आहे.
जातीय समीकरणे -
शहर परिसरात मुस्लीम, लिंगायत, वंजारी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लिंगायत, मातंग मराठा आणि इतर हे भाजपाच्या मागे जातील. तर मुस्लिम आणि दलित मते यांचे विभाजन हे राष्ट्रवादी आणि वंचितमध्ये होईल. त्याचा थेट फायदा भाजपाला होईल अशी स्थिती आहे.
रोजगाराची परिस्थिती
लातूर-उदगीर हा मुख्य रस्ता असेल किंवा उदगीर इथून कर्नाटक, तेलंगणा राज्य रस्ता, उदगीर-अहमदपूर-नांदेड, उदगीर-जळकोट आणि कोणत्याही शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्ते व महामार्ग विकासात खूपच मागासलेला उदगीर मतदारसंघ कृषी आधारित व्यवसायावर चालतात. मात्र त्यांना गती मिळत नाही. रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचे लोंढे हे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोरकडे जाताना दिसत आहेत. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक, आरोग्यविषयक सोयी-सुविधा, व्यापार, उदयोग, कारखानदारीच्या अभावाने उदगीर हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असूनही अतिशय वाईट अवस्थेत आहे. वाढत्या बेरोजगारीकडे कोणाचेही लक्ष नाही.
युतीत जागा - भाजपा : आमदार सुधाकर भालेराव ( दोन टर्म )
आघाडीत जागा - राष्ट्रवादी काँग्रेस
2014 ची परिस्थिती :
एकूण मतदार - 2,71,610
प्रत्यक्ष मतदान - 1,70,199
सुधाकर भालेराव - 66,687 (भाजप)
संजय बनसोडे - 41, 800 (राष्ट्रवादी काँग्रेस)
राम अदावळे - 15,415 (शिवसेना)
रामकिशन सोनकांबळे - 37,837 (काँग्रेस)

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget