'मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू', निकालाच्या पहिल्या कलानंतर संजय राऊतांची फटकेबाजी!
Lok Sabha Election Result : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देशात भाजपला फटका बसेल असा दावा केलाय.
मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election2024 Result ) मतमोजणी केली जात आहे. एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) यावेळी भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकावरील इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसतेय. यावरच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचे विधानक केले आहे.
काँग्रेसला 150 पेक्षा अधिक जागा मिळतील
नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून उभे आहेत. ते काशीपुत्र आहेत. तेथेदेखील नरेंद्र मोदी तीनवेळा पिछाडीवर आहेत. साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल. या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्याने पुढे जात आहे. एक्झिट पोलचे जे आकडे आले होते ते इंडिया आघाडीने पार केले आहेत. इंडिया आघाडी खूप पुढे गेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. ज्या काँग्रेस पक्षाला मागच्या निवडणुकीत 50 जागाही मिळाल्या नव्हत्या. तोच पक्ष आता 150 जागांच्या पुढे जाऊ शकेल असे मला वाटते.
'...म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो'
काँग्रेसचं 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. जो आमचा अभ्यास आहे, त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण यावर चर्चा करण्यासाठी अद्याप वेळ आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे
महाराष्ट्रात पहिल्या निवडणूक निकालातील कल पाहता महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. विदर्भ, मराठवाड्यातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. नंदूरबारमध्ये काँग्रेस उमेदवार 1 लाख मतांनी निवडून येतील. तर, बीडमध्येही बजरंग बप्पा पुढे आहेत, मुंबईतही शिवसेना मोठा विजय मिळवत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
गोबेल्स नीती वापरून भाजपने प्रोपोगंडा केला
देशाचा नवा पंतप्रधान कोण होणार तसेच सत्ता कोण स्थापन करणार हे आज चार वाजेपर्यंत स्पष्ट होईल. भाजपने गोबेल्स नीतीने प्रोपोगंडा केला होता, अशी टीकाही राऊत यांनी केली.
पाहा संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेचा संपूर्ण व्हिडीओ :
हेही वाचा :