एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मला संपर्क करू नका, मी जातोय'
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. "राजे गेले ,सेनापती गेले पण आमच्यासारखे मावळे अजून आहेत. आम्ही लढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले उद्या (14 सप्टेंबर) नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विटरवर ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून उदयनराजेंना थांबवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील उदयनराजेंशी संपर्क करुन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र राजेंनी 'मी जातोय. मला संपर्क करु नका', असं सांगितल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे.
"मी उदयनराजे यांना संपर्क करण्याचं खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे मेसेज पाठवला की, मला संपर्क करू नका, मी जातोय", अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. "उदयनराजे माझे कॉलेजमध्ये सिनियर होते, तेव्हापासून आमची मैत्री आहे. काल शरद पवारांसोबत आमची बैठक झाली. विधानसभेच्या प्रचाराबाबत चर्चा झाली. महाराजांनी भाजप सरकारच्या कामावर टीका केली. त्यानंतर मी कामाला लागलो. संध्याकाळी अचानक काय झालं कळलं नाही", असंही धनंजय मुंडे म्हणाले. पवार साहेबांना अशा काळात महाराज सोडून गेले, याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या पक्ष सोडून जाण्याबाबत मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. "राजे गेले ,सेनापती गेले पण आमच्यासारखे मावळे अजून आहेत. आम्ही लढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
खासदार उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते व हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश करणार आहेत.
उदयनराजेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement