एक्स्प्लोर

Raj Thackeray on BJP: भाजप उमेदवारांची दोन-अडीच हजार मतं EVM मशीनमध्ये आधीपासूनच भरलेली, राज ठाकरेंचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray on BJP: जिंकण्या हरण्याचा विषय नाही. ही फेअर इलेक्शन नाहीयेत, इतकंच फक्त आम्हाला सांगायचं आहे, असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पिंपरी : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांचं युध्द राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना हे पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत. तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशातच भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी १२८ पैकी १२५ नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपच्या १२५ जागा आल्या, तर मी कायमचे राजकारण सोडेन. नगरसेवकांना पक्षात घेताना मतदान यंत्रामध्ये (ईव्हीएम मशीन) दोन ते अडीच हजार मते आपोआप मिळतील, असे भाजपकडून सांगितले जाते, असा गंभीर आरोप बहल यांनी केला आहे. बहल यांच्या या आरोपामुळे आता राजकारण तापण्याल्याचं दिसून येत आहे. याबाबत एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी याबाबत भाष्य केलं आहे. (Raj Thackeray) 

Raj Thackeray: नेमकं काय म्हणालेत राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, परवा चार-पाच दिवसांपूर्वी ते आलं होतं, फार कोणी चालवलं नाही, अजित पवार स्वतः म्हणाले आमच्या लोकांना सांगितलं गेलं की, आमच्याकडे या आमच्या पक्षात या.. म्हणजे भाजपामध्ये या.. अडीच अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये भरलेले आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा असंही राज ठाकरे म्हणालेत.., तर सत्तेमधीलच एक भाग जो आता वेगळा होऊन महानगरपालिका निवडणूक लढवत आहे, इतका जबाबदार माणूस.. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की, भाजपने मशीन मध्ये अडीच अडीच हजार मते भरलेली आहेत म्हणजे आम्ही काय समजायचं सांगा. या सगळ्यांमध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही. ही फेअर इलेक्शन नाहीयेत, इतकंच फक्त आम्हाला सांगायचं आहे, असे पुढे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.(Raj Thackeray) 

योगेश बहल काय म्हणाले होते?

ईव्हीएम मशीन (Evm) सेट केल्यात का? तर ते त्यांनाच माहीत, जर भाजप 125 जागा निवडून आल्या तर कायमच राजकारण सोडून देईल,100 जागा मिळवणं पण अवघड आहे फोडाफोडीच्या राजकारणात ते लोकांना सांगत आहेत, ईव्हीएम मशीन (Evm) मशीन मध्ये तुम्हाला दोन ते अडीच हजार मतदान आपोआप मिळतील बाकी मदत पण आम्ही करू तुम्ही आमच्याकडे या जी लोक राष्ट्रवादी सोडून गेली स्वतःवर विश्वास नाही की आपण राष्ट्रवादीकडून निवडून येऊ शकत नाही अजितदादा सारख्या चांगले नेत्याला सोडून जाऊन ते काय साध्य करणार आहेत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवडचे 
शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget