EVM वर तुतारी एक नंबरला, तर दोन नंबर धंदे करणाऱ्या माणसाचा नंबर 2; शरद पवारांचा उमेदवार काय काय म्हणाला?
Mahesh Kothe on Vijaykumar Deshmukh, सोलापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेश कोठे यांनी माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी टीका केली आहे.
Mahesh Kothe on Vijaykumar Deshmukh, सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका केली आहे. EVM मशीनवर तुतारीचा नंबर एक आहे आणि दोन नंबर धंदे करणाऱ्या माणसांचा नंबर हा 2 आहे, असं म्हणत महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुखांवर टीका केली आहे. ते प्रचारसभेत बोलत होते.
महेश कोठे म्हणाले, लुटारूला लुटणे पाप नाही, त्यामुळे पैसे देत असेल तर घ्या सोडू नका. 20 वर्षे आमदार असून देशमुखांनी सोलापूरला साधी चहाची टपरी देखील आणली नाही. उत्तर सोलापूरच्या मतदारांना मी सांगितले, लुटारूला लुटणे पाप नाही, त्यामुळे देत असेल तर घ्या सोडू नका. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे स्वतःच्या कामावर नव्हे तर जातीपातीचे राजकारण आणि मोदी लाटेमुळे निवडून आले आहेत. जे आमदार मतदारसंघात कधी फिरकले नाहीत त्यांना प्रत्येकाच्या दारात जोगवा मागत फिरावं लागत आहे. शरद पवारांसारखा शब्द पाळणारा नेता म्हणजे शरद पवारच आहेत. एका कार्यकर्त्याला धमकी दिली की तू त्यांच्यासोबत फिरू नको.
देशमुखांनी चार कामे केली असतील तर शरद पवार यांची माफी मागून मी उमेदवारी माघारी घेतो
पुढे बोलताना महेश कोठे म्हणाले, तरीही तो कार्यकर्ता काल आमच्यासोबत रॅलीत आले तेव्हा त्यांनी त्याला जे हॉटेल चालवायला दिले होते ते काढून घेतले. बहीणीचे संरक्षण करण्याऐवजी तिचा वापर कसा करायचा हे सुरु आहे. घरातील बहिणी सुरक्षित नाही. मी विजयकुमार देशमुख यांना एक महिन्यापूर्वी आव्हान दिले होते की तुम्ही केलेली चार कामं सांगा. जर त्यांनी चार कामे केली असतील तर शरद पवार यांची माफी मागून मी उमेदवारी माघारी घेतो. 20 वर्षे आमदार असून त्यांनी सोलापूरला साधी चहाची टपरी देखील आणली नाही.
आमदाराच्या मुलाने सांगितले की, "एक लाखाने आम्ही निवडून येणार." मी म्हणतो एक लाख मतांनी नव्हे तर जनता लाथ घालून पाठवणार आहे. भाजप आमदारांनी स्मार्ट सिटीच्या कामासाठी ठेकेदाराकडून मलिदा घेतला. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराला विचारू शकत नाही. सोलापूरचा मतदार स्वाभिमानी आहे, तो पैशापुढे झुकणार नाही.उत्तर सोलापूरच्या मतदारांना मी सांगितले, लुटारूला लुटणे पाप नाही, त्यामुळे देत असेल तर घ्या सोडू नका. 5 वर्ष मंत्री होते त्यांनी त्याकाळात काय केले ते सांगावे. जिल्ह्याचा निधी हातात होता तो कुठे वापरला हे दाखवा. माझं विजयकुमार देशमुख यांना खुले आव्हान आहे की ओपन चर्चेला या आणि विकासाच्या विषयावर चर्चा करा. सोलापूरच्या आयटी पार्कसाठी आत्तापर्यंत 50 लाख रुपये खर्च झालेत. त्याच्या पावत्या मी दाखवतो. एक वर्षात आयटी पार्क करायचे होते पण या सरकारने आयटी कंपनीबाबत काही कायदे बदलले नाहीत, त्यामुळे उशीर होतोय, असंही महेश कोठे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या