एक्स्प्लोर
Thane Election Live Update : शिवसेनेचे ठाणे राहणार की वेगळाच निकाल लागणार?
ठाण्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. निवडणुकांच्या निकालासाठी आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ठाण्यात आता कुणाची सत्ता येणार, शिवसेनेचे ठाणे राहणार की वेगळाच निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ठाणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. राज्यभर सर्वांचं लक्ष आता निकालावर लागलं आहे. आपला भावी आमदार निवडण्यासाठी मतदारांनी दिलेला कौल आज जाहीर होणार आहे, मतमोजणीस सुरुवातही झाली आहे. विधानसभेसाठी सोमवारी 21 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला मात देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे. विधानसभेसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेली हाक मतगारांपर्यंत पोहोचली आहे की नाही हे काही तासात निकालाच्या रुपाने स्पष्ट होणार आहे.
येणाऱ्या काही तासात आपल्याला ठाणे जिल्ह्यातील 18 जागांवर कुणाचं वर्चस्व राहील हे आपल्यासमोर येणार आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील प्रमुख लढतींकडे सर्वांचं आकर्षण असणार आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघ
128 डहाणू मतदारसंघ - विनोद निकोले (माकप) वि. पास्कल धनारे (भाजप) वि. सुनिल निभाड (मनसे) वि. अॅड. शेलानंद कांतेला वंचित अपक्ष
129 विक्रमगड - सुनिल भुसारा (राष्ट्रवादी) वि. हेमंत सावरा (भाजप) वि. वैशाली जाधव (मनसे) वि. प्रकाश निकम
130 पालघर - योगेश नाम वि. श्रीनिवास वनगा वि. उमेश गोवारी वि. अॅड. विराज गडग
131 बोईसर - राजेश पाटील वि. विलास तरे वि. दिनकर वाढान वि. राजेसिंह मांगा
132 नालासोपारा - क्षितीज ठाकूर वि. प्रदिप शर्मा वि. प्रविण गायकवाड
133 वसई - हितेंद्र ठाकूर वि. विजय पाटील प्रफुल्ल ठाकुर वि. सईद शेख
134 भिवंडी ग्रामीण मतदारसंघ - माधुरी म्हात्रे वि. शांताराम मोरे वि. स्वप्निल कोल
135 शहापूर मतदारसंघ - दौलत दरोडा वि. पांडुरंग बरोरा वि. हरिश्चंद्र खांडवी
136 भिवंडी पश्चिम मतदारसंघ - शोएब अश्फाक वि. महेश चौघुले वि. नागेश मुकादम वि. सुहास भोंडे
137 भिवंडी पूर्व मतदारसंघ - संतोष शेट्टी वि. रुपेश म्हात्रे वि. मनोज गुडवी वि. बुद्धेश जाधव
138 कल्याण पश्चिम मतदारसंघ - कांचन कुलकर्णी वि. विश्वनाथ भोईर वि. प्रकाश भोईर वि. नरेश गायकवाज
139 मुरबाड मतदारसंघ - प्रमोद हिंदुराव वि. किसन कथोरे वि. सुमेर भंवर वि. धनंजय सुर्वे
140 अंबरनाथ मतदारसंघ - रोहित साळवे वि. डॉ. बालाजी किणीकर वि. सुमेत भंवर वि. धनंजय सुर्वे
141 उल्हासनगर मतदारसंघ - ज्योती कलानी वि. कुमार आयलानी वि. साजनसिंह लबाना
142 कल्याण पूर्व मतदारसंघ - प्रकाश तरे वि.गणपत गायकवाड वि. अश्विनी धुमाळ
143 डोंबिवली मतदारसंघ - राधिका गुप्ते वि. रविंद्र चव्हाण वि. मंदार हळबे वि. रजनी अगळे
144 कल्याण ग्रामीण मतदारसंघ - रमेश म्हात्रे वि. प्रमोद (राजू) पाटील वि. अमोल केंद्रे
149 मुंब्रा - कळवा मतदारसंघ - जितेंद्र आव्हाड वि. दिपाली सय्यद वि. जयवंत बैले
145 मीरा-भाईंदर मतदारसंघ - सय्यद मुझफ्फर हुसेन वि. नरेंद्र मेहता वि. हरीश सुतार वि. सलीम खान
146 ओवळा-माजिवडा मतदारसंघ - विक्रांत चव्हाण वि. प्रताप सरनाईक वि. संदिप पाचंगे वि. अॅड. किशोर दिवेकर
147 कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ - संजय घाडीगावकर वि. एकनाथ शिंदे वि. महेश कदम वि. उन्मेष बागवे
148 ठाणे मतदारसंघ - संजय केळकर वि. अविनाश जाधव वि. अमर आठवले
150 ऐरोली मतदारसंघ - गणेश शिंदे वि. गणेश नाईक वि. निलेश बाणखेले वि. डॉ. प्रकाश ढोकळे
151 बेलापूर मतदारसंघ - अशोक गावडे वि. मंदा म्हात्रे वि. गजानन काळे वि. विरेंद्र लगडे
ठाणे - पालघर जिल्ह्यातील विजयी उमेदवार
पालघर
डहाणू - विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड - सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर - श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा - क्षितीज ठाकूर, बविआ
वसई - हितेंद्र ठाकूर, बविआ
ठाणे
भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व - रईस शेख, सपा
शहापूर - दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड - किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर - कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व - गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण - प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली - रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर - गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा - प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे - संजय केळकर, भाजप
ऐरोली - गणेश नाईक, भाजप
बेलापूर - मंदा म्हात्रे, भाजप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement