एक्स्प्लोर
Advertisement
स्वाभिमानीचं दबावतंत्र! माढ्यातून पवारांविरोधात राजू शेट्टी मैदानात?
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, असा ठराव सोलापुरातील वेळापूरमध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माढा लोकसभा मतदारसंघ मेळाव्यात करण्यात आला
पंढरपूर : माढ्यातील लोकसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात पारीत करण्यात आला. एकप्रकारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दबावतंत्र सुरु केल्याचं दिसत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून पवारांविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, असा ठराव सोलापुरातील वेळापूरमध्ये झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघ मेळाव्यात करण्यात आला. स्वाभिमानीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर प्रेशर टॅक्टीक्ट्स वापरण्यास सुरुवात केल्याचं समोर आलं आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली माढा लोकसभा मतसंघात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.
गेल्या वेळी सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून 'स्वाभिमानी'कडून लढताना जवळपास साडेचार लाख मतं मिळवली होती. या मतदारसंघात स्वाभिमानीचं चांगलं नेटवर्क असल्याने माढा लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे.
यंदा हातकणंगलेसोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आजच्या मेळाव्यात दिसून आला. एका बाजूने रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा करत असून स्वाभिमानीने बुलडाणा आणि वर्धा या दोन मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. अजूनही कॉंग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना आज माढ्यासाठी स्वाभिमानीने केलेला ठराव शरद पवार आणि कॉंग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement