''चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, त्यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं, त्या पारंगत असाव्यात''
पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही , चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पुणे : शिवसेना उबाठा (Shivsena) पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्यावरुन भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. त्यावरुन, आता शिवसेना आणि भाजपाच्या महिला नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असून वाघ यांच्या टीकेला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला, आधी तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचं, अशी त्यांची सवय आहे. आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.
पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही , चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षचा सल्ला घ्या. अर्धवट माहिती घेवून बोलायचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असे म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं. या ऍपवर जाणारे प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात. माझ याच ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला प्रत्त्युत्तर दिलं आहे.
रेवण्णा फ्रान्समध्ये मजा मारतोय
जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा... अशा तीव्र संतापजनक शब्दात प्रियंका चुतर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.
सुषमा अंधारेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतर बोलण्याचा प्रयत्न केला
आधी तीर मरायचं आणि नंतर वर्तुळ करायच
आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता
एक फोटो जिथे दाखवत आहेत तिथे गिरीश महाजन आणि फरांदे बाईचा वीडियो दाखवला होता
आक्रस्थळे बाई किंवा ते बघत असतील, आम्ही ते बघत नाहीत
एखादा कलाकार वेगवेगळ्या भूमिका करत असतो
नवनीत राणा यांचे अस्मारे इंटिमेट सीन आणि नंतर उमेदवारी मिळाली त्या बद्दल असाच बोलणार का
कंगना राणावत ची जे चित्रपट आहेत त्या बद्दल काय बोलायचं आहे त्यांना
ह्या त्याच बाई आहेत सोयीस्कर भूमिका घेतात
निर्मला यादव न्याय मागते तेव्हा कुठे बिळात असतात
प्रज्वल रेवण्णे ३ हजार पेक्षा जास्त वीडियो बाहेर आले
त्यावर तुम्ही काय केलं
महिला वैगेरेचे भूमिका घेत
मोदीनं प्रश्न विचारायला यांची जीभ उघडणार आहे का..
ज्या प्रेस मध्ये व्हिडियो बाहेर आले
तरी मोदी तिथे जाऊन सांगतात की आम्हाला हात बळकट करायाचे आहेत
त्याला जर्मनीला काढून दिला
ही मोदीची गॅरंटी आहे का ?
मुलुंडचा HD स्पेशॅलिस्ट त्यावर त्या बोलल्या नाहीत
त्यांनी सोमयावर पण आक्षेप घेतला पाहिजे
सोमय्या कसे काय प्रचार करतात
रेवण्णाचा प्रचार करणाऱ्या मोदींना फुली मारणार आहेत का ?
मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला
अर्धवट माहितीवर ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न केला आहे
पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही
चित्र बाई पॉर्न फिल्म बघत असतील
आधी आपल्या पक्षचा सल्ला घ्या
अर्धवट माहिती घेवून बोलायचं प्रयत्न केला आहे
ऑन फडणवीस
निवडणूक हातातून निवडणूक गेल्या आहेत
बूद से गाई ओ हौद से नहीं आती
चर्चेत राहण्यासाठी उपटसंभासारखे चर्चा घडवून आणावीशी वाटते
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात तोडफोड केली
आज २ तारीख आहे पगार होण्याचा दिवस आहे
ऑन तिरोडकर
आम्ही नेकसुस बाहेर काढू
१० महिने झालं अजून काही झालं नाही
अनेक लोकांची नाव घेतली होती
केतन तिरोडकरचा आरोप गंभीर आहे
कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊस कडून रेकॉर्ड चेक केलं जात
या ऍप वर जाणारा प्रोग्राम सेन्सर केला जातो, भारत सरकारकडून सेन्सॉर होतात
माझं याचं ज्ञान कमी आहे
चित्रा वाघ यांचं पॉर्न व्हिडीओचं ज्ञान अगाध असावं किंवा त्या पारंगत असाव्यात