एक्स्प्लोर

नाशिकमध्ये राडा, सुहास कांदेंनी नांदगावमध्ये बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखली, नेमकं काय घडलं?

Nandgaon Vidhan Sabha Constituency : नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदेनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी रोखल्याने मोठा राडा झाला आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency Election) मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या गटात जोरदार बाचाबाची झाली. 

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच नांदगाव विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात चर्चा झाली. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, ठाकरे गटाचे गणेश धात्रक आणि अपक्ष डॉ. रोहन बोरसे यांचे प्रमुख आव्हान आहे. तर नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार गणेश धात्रक व सुहास कांदे यांच्यासह अकबर सोनावाला, गौतम गायकवाड, आनंद शिगारे, फिरोज करींम, वाल्मीक निकम, वैशाली व्हडगर, सुनील सोनवणे, हारुण पठाण आदी चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नांदगावमध्ये जोरदार राडा

आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला सुरुवात होऊन दोन तास उलटत नाही तोच नांदगावमध्ये जोरदार राडा झाला. सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवले.  यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघाले होते. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचे दिसून आले. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवले. यामुळे नांदगावमध्ये वातावरण तापले आहे. आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस दोन्ही गटांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. 

अडवून ठेवलेले मतदार संतापले

आता समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापले आहेत. आमचा वेळ वाया घालवू नका. आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका. पोलिसांनो, आमचे आधारकार्ड तपासा. आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातले आहोत. केवळ जेवणासाठी थांबलेलो होतो. संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे म्हणत आता मतदारांनी संताप व्यक्त केलाय. 

नांदगावमध्ये EVM मशीन पडले बंद

दरम्यान, नांदगाव मतदारसंघातील 164 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तब्बल दोनदा बंद पडले आहे. न्यू. इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार घडला आहे. मतदार तब्बल दोन तासांपासून मतदानासाठी ताटकळत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावली असून मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदारांना आपला हक्क बजावता आलेला नाही. यामुळे निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget